एड्स विषयक जनजागृती होणे काळाची गरज : डॉ. किशोर पाठक
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्दारा जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे तर मार्गदर्शक म्हणून डॉ. किशोर पाठक हे लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. डॉ. किशोर पाठक यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती स्पष्ट करून सांगितले. एड्स हा रोग एच आय व्ही जीवाणूपासून होतो. एड्स होण्याची कारणे स्पष्ट करून सांगताना त्यांनी सांगितले की, एचआयव्ही बाधित व्यक्तीचे रक्त जर एखाद्या व्यक्तीला मिळाले तर एड्स होतो. गर्भवती महिला एड्स बाधित असल्यास तिच्या अपत्यास एड्स होतो. असुरक्षित योन संबंध आल्यास एड्स होतो. इत्यादी कारणे स्पष्ट करून सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी समाजामध्ये एड्स संदर्भात जागृती अभियान राबवावे.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमोडे यांनी एड्स बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास काहीच घाबरण्याचे कारण नाही. संपर्क आल्यास किंवा सदर व्यक्तीच्या सोबत राहिल्यास एड्स होत नाही. त्या व्यक्तीला सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणुक द्यावी. रासेयो स्वयंसेवक यासंदर्भात आपआपल्या गावांमध्ये जनजागृती घडवून आणावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिनी वाघ रासेयो महिला सहायक कार्यक्रम अधिकारी तर आभार प्रा दिलीप गिर्हे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.