चोपडा
मास्कवर शैक्षणिक आकृत्या- एक उपक्रम
चोपडा (विश्वास वाडे) बालमोहन माध्यमिक विद्यालयात मास्कवर शैक्षणिक आकृत्या काढून संकल्पना स्पष्ट व्हाव्यात त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना आपल्याला बरेच काही शिकवून गेला. त्यासोबत मास्क वापरणे आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण शारीरिक वस्तु झालेली आहे. त्याचा उपयोग आपल्याला अध्यापनात होईल या अनुषंगाने उपशिक्षिका स्मिता बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना पांढऱ्या रंगाचे मास्क घ्यायला लावले व प्रत्येक विषयातील शैक्षणिक आकृत्या काढण्यास प्रोत्साहित केले. यामुळे वेगवेगळ्या आकृत्या चेहऱ्यावर दिसतात व शैक्षणिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली. सदर उपक्रमासाठी व्यवस्थापक दिवाकर नाथ, मुख्याध्यापिका रेखा पाटील, गोपाल पाटील, प्रतिभा पाटील, अनिता मैलागिर यांचे सहकार्य लाभले.