बालमोहन विद्यालयात प्रथम दिनी बालकांचे स्वागत
चोपडा (विश्वास वाडे) बालमोहन प्राथमिक विद्यालयात कोरोना कालखंडानंतर १ डिसेंबर २०२१ रोजी शासन परिपत्रकान्वये इयत्ता १ ली ते ७ वीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यालयाचे व्यवस्थापक दिवाकर नाथ मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, बालवाडीच्या मुख्याध्यापिका रेखा नेवे यांनी गुलाब पुष्प देवून विद्यार्थी व वाहन चालक यांचे स्वागत केले.
यावेळी उपशिक्षक मयुरेश्वर सोनवणे, मोईद सैय्यद, राकेश महाजन, विकास गोहील, विनय पाटील, संजय पाटील, जगदीश धनगर, राहुल पाटील, रविंद्र साळुंखे, देवेंद्र केदारे, श्याम पावरा, चंद्रकांत पाटील, योगेश चौधरी, शेखर पाटील, सुनीता साठे, वंदना आर पाटील, वंदना डी पाटील, स्मिता बाविस्कर, नरगिस पटेल, सोनाली साळुंखे, हर्षल साळुंखे, पल्लवी चौधरी, वैशाली वसईकर, शिक्षकेतर कर्मचारी निलेश निकम, दिपक नेवे, डी. डी. पाटील, भूपेंद्र माळी, भूषण बाविस्कर, विनोदसिंह जोहरी, गुरव, उषा पाटील, सुरेखा पाटील, प्रमिला चौधरी आदी कोरोना नियमांचे पालन करत उपस्थित होते.