मूकबधिर निवासी विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा
शिदाड ता. पाचोरा (प्रतिनिधी) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज माजी विद्यार्थी संघ संचालित, मूकबधिर निवासी विद्यालयात ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून कोकिळा प्रकाश पाटील या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दिव्यांग क्षेत्रात उत्तुंग असे काम केलेल्या महान विभूती हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
तसेच विद्यालयाची पहिली माजी विद्यार्थिनी उषा कुंभार हिस कपडे देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक संजय पाटील, स्वयंपाकी रमेश गायकवाड विद्यालयाचे माजी विद्यार्थी शुभम झेरवाल व मुकेश भोई यांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. आभार ईश्वर पाटील यांनी केले.