श्री संताजी जगनाळे महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) श्री संताजी जगनाळे महाराज पालखी सोहळ्याची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत फार मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थीत होते. गत २ वर्षात (कोरोणा काळात) मयत झालेल्या समाज बांधवाना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात झाली.
बैठकीचे अध्यक्ष म्हणून गट नेते जीवनभाऊ चौधरी यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या हस्ते श्री संताजी महाराजांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले. समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश चौधरी यांनी प्रास्ताविक करून मोलाचे मार्गदर्शन केले. समाज म्हणजे आपले कुटूंब असून श्री संताजी पालखी सोहळा हा कुटूंबाचा सोहळा असून तो प्रत्येकाने आनंदाने व उत्साहाने साजरा करावा व आपली सामाजीक एकता दाखवावी असे भावनीक आव्हान प्रकाश चौधरी यांनी केले.
यंदाच्या श्री संताजी पालखी सोहळ्यासाठी सर्वानुमते गोरख मधुकर चौधरी यांची अध्यक्ष म्हणून तसेच अनंत मोतीलाल चौधरी, विलास विजय पाटील, दिपक वामन चौधरी, भूषण अशोक चोधरी, शरद वासुदेव चौधरी यांची उपाध्यक्ष म्हणून निवळ करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष म्हणून अर्जुन चौधरी व खजिनदार म्हणून भरत भटू चौधरी यांची निवळ करण्यात आली.
तसेच सुनील नागो चौधरी, प्रकाश सुरेश चौधरी, किरण रघुनाथ चौधरी, भूषण ज्ञानेश्वर चौधरी, गोर्वधन चौधरी, रितेष चौधरी, विकी चौधरी, निलेश चौधरी, कपील चौधरी, किशोर लक्ष्मण चौधरी, राम कृष्ण चौधरी, यांची सदस्य म्हणून एकमताने निवळ करण्यात आली. मिटिंगमध्ये श्री संताजी सेवक सर्व किरण रघुनाथ चौधरी, किरण कौतीक चौधरी, अर्जुन चौधरी, संजय छगन चौधरी यांनी मोलाच्या सुचना मांडल्या व अतिशय आनंदात मिटिंग झाली.
शेवटी गटनेते जिवन चौधरी यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. चोपडा तेली समाजाची सामाजीक कौटूबीक एकतेचे नांव संपूर्ण महाराष्ट्रात उज्वल असून तो नावलौकीक आपण कायम टिकवू या असे मोलाचे विचार जीवन चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश चौधरी, फुलचंद अण्णा, भुपेन्द्र, संजय छगन चौधरी, विनोद शांताराम चौधरी व समाज बांधव उपस्थित होते.