भाविक भक्तांची श्रध्दास्थान असलेली ६४ कुळांची कुलदैवत नागाई माता-नागपंचमी यात्रा
साक्री (प्रतिनिधी) कुलस्वामिनी, कुलदैवत नागाई माता भाविकांच्या नवसाला पावणारी ६४ कुळाचा उद्धार करणारी कुलस्वामिनी म्हणजे नागाई माता स्वयंभू प्रकट झालेल्या मातेचे मंदिर धुळे जिल्हातील साक्री तालुक्यात कोकले -नागपुर गावाच्या नदी काठी आहे. भक्तांच्या भक्ती भाव आणि दानपुनाने मंदिराचा चार ते पाच वेळा जीर्णउद्धार झाला आहे.
या मंदिरात मठाधीपती मंहत श्री १०८ प्रणवगिरीजी महाराज (बाबाजी) हे पुजारी आहेत. या मंदिरात पुर्वी नागाई मातेच्या पायापासुन पाणी वाहत होते. या पाण्यात अंघोळ केल्याने त्वचारोग बरा होतो आणि भक्तांची मनोकामना पुर्ण होते अशी श्रध्दा आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर परिसराचा विकास झाला पाहिजे म्हणून मंदिर ट्रस्टच्या संचालकांनी मंदिर बांधकाम करण्याचे ठरवले. त्यानुसार पाण्याच्या खोल कुंड्यावर बांधकाम करून पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. परंतु मातेचा चमत्कार म्हणावा किवा भक्तांना अंघोळ करता यावी म्हणून पुन्हा पाण्याचा प्रवाह बाहेर भुयारी मार्गाने निघाला. हे पाणी कुठून येतं याचा शोध शास्त्रद्यांनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु शोध लावता आला नाही.
मंदिरात साधारण ५०० वर्षांपूर्वी नागाई माता भक्त नाग पुजारी नागा बाबा होते. मातेने नागा बाबा यांना साक्षात दर्शन दिले होते. त्यानंतर नाग पुजारी नागा बाबा यांनी जिवंत समाधी घेऊन देव लोकात विलीन झाले आजही त्यांची समाधी त्याठिकाणी आहे. नागाई माता मंदिरात भाविकांच्या कृपेने वर्षातुन चार वेळा सजावट होते नाग दीपावली, महाशिवरात्री, नवरात्र,आणि चौत्र महिण्यात चावदसला मोठी यात्रा भरते खास करून नाग दीपावलीला खुप म्हत्व असते. आठ ते दहा दिवस कार्यक्रम होतो.
सकाळ, संध्याकाळ आरती ज्ञानेश्वरी प्रारायन व खान्देशात प्रथमच शतचंडी महायज्ञ होम पुजा होते महाराज (बाबाजी) यांच्या पुढाकाराने भंडारा महाप्रसाद अन्नदान होते तर नवरात्र मध्ये नऊ दिवस गरबाचा कार्यक्रम होत असतो. भक्तांच्या दान पुनाने मंदिर परिसर मन प्रसन्न करणारे आहे. याठिकाणी महाराष्ट्र, गुजरातमध्ये प्रदेश येथून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. नागाई माताच्या कार्यक्रमांचा लाभ भक्तांनी घ्यावा.