महाराष्ट्र
बोदवड येथे कुणाच्या आशीर्वादाने बेकायदा व्यवसाय सुरू ; शहरात चर्चा
बोदवड (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोडवर शहरालगत असलेला नाल्याच्या काठावर भराव करून काही लोकांनी बेकायदा साबण निर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. ह्या ठिकाणी साबण बनवण्यासाठी घातक रसायनाचा वापर सरासपणे करत असून त्यापासून साबण निर्मिती केली जाते आहे.
यासाठी समधीत, व्यावसायिक हे जमिनीत खड्डे करून कॉस्मेटिक सोडा व इतर रसायने त्या खड्डात सोडतात व काही दिवस ती रसायने तिथे राहिल्यानंतर घट्ट झाल्यावर बाहेर काढली जातात. पण या दरम्यान खड्डात टाकलेले रसायने जमिनीत देखील मुरतात. यामुळे जमीनीचे प्रदूषण तर होतेच शिवाय भूगर्भातील पाणी देखील दूषित होते. तरीही रस्ता लगत खुले आम चालणाऱ्या ह्या व्यवसायाचे पालक कोण कोणाच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सरासपणे सुरू आहे असा प्रश्न शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.