राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते १३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
विकास कामांसह प्रमुख रस्ते होणार चकाचक
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील मोढा बु., वडोद चाथा, वडाळा, बोजगाव, अंभई, शेखपूर, पिंपळगाव घाट येथे रस्ते व विविध विकासासाठी शासनाच्या विविध विभागातून जवळपास १३ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते विविध गावात या मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या कामाला त्वरित सुरुवात होणार असल्याने वरील गावात विकास कामांसोबत प्रमुख रस्ते चकाचक होणार आहेत.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, रमेश साळवे, सुभाष गव्हाणे,नगरसेवक शेख सलीम हुसेन, संजय मुरकुटे यांच्यासह नायब तहसीलदार शैलेश पटवारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किशोर मराठे, शाखा अभियंता महावीर कांबळे, विशाल चाटे, मुख्यमंत्री सडक योजनेचे सुनील गुडसुरकर, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश राजगुरू आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मोढा बु. येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मोढा, मंगरूळ ते रहिमाबाद रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख, वडोदचाथा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत गुरूनाथ मंदिर ते अंबाबाई देवी मंदिर पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख, तर प्रजिमा – ५ ते अंबाबाई देवस्थान पर्यंत जोडरस्त्याची सुधारणा करणे २५ लाख, वडाळा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत वडाळा, वडोदचाथा – भराडी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ५ कोटी ५० लाख, जिल्हा परिषद विभाग अंतर्गत वडाळा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण व तार कंपाउंड करणे १० लाख, बोजगाव येथे गावांतर्गत रस्ता पेव्हर ब्लॉक बसविणे व गावात पथदिवे बसविणे १० लाख, अंभई येथे भराडी रस्त्याची दुरुस्ती करणे २ कोटी, शेखपूर येथे मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत रा.मा. २१४ ते मेवातनगर रस्त्याची सुधारणा करणे ३५ लाख तर पिंपळगाव घाट येथे आमठाणा, अंभई उंडणगाव रस्त्यावरील खेळणा नदीवर पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ६० लाख असे एकूण जवळपास १३ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास भराडी येथील अनिस पठाण, पालोद उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, केऱ्हाळा येथील दत्ता कुडके, राजुमिया देशमुख, प्रवीण मिरकर, वांगी येथील बापू काकडे, मोढा खु. येथील लक्ष्मण कल्याणकर, समाधान साळवे, एकनाथ पंडित, मोढा बु. उपसरपंच दीपक हावळे, गणेश ढोरमारे, वडोदचाथा सरपंच पंढरीनाथ चाथे, उपसरपंच किसन साबळे, वडाळा येथील कृष्णा पांडे, कृष्णा डापके, नागोनाथ गव्हाणे, श्रीरंग शेळके, बोजगाव सरपंच प्रियांका रवी अमृते, माजी सरपंच लिलाबाई झेंडेकर, विठ्ठल शेलार, सोमिनाथ शेलार, शेखपूर सरपंच सुरेश खेबडे, फिरोज शेख, धीरज हाके अंभई उपसरपंच रामदास दूतोंडे, रईस देशमुख, शंकर सोनवणे, शमशोद्दीन हवालदार, समाधान भुईगळ, शेख वसीम, तांडा येथील सरपंच गजानन राठोड, सुनील सोनवणे आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.