शहराच्या नगर पंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरल्या नंतर बुधवारी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली.
सोयगाव (प्रतिनिधी विवेक महाजन)
सोयगाव : प्रभागातील 17 जागांसाठी एकूण 90 अर्ज प्राप्त झाले होते.त्यापैकी 4 प्रभागात ओबीसी आरक्षणाची स्थगती आल्याने 14 अर्ज वगळता 76 उमेदवारी अर्जातून 31 अर्ज अवैध व 45 अर्ज वैध ठरले.

एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करने, एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक पक्षांचे चिन्ह लिहून सूचक केवळ एकच देत ये बी फार्म व्यतिरिक्त असलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी एस आर मोरे आणि सहाय्यक अधिकारी रमेश जसवंत मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, नायब तहसीलदार व्ही टी जाधव,कार्यालयीन अधीक्षक ईश्वर शिमरे यांनी ही प्रक्रिया पार पाडली.
प्रभागा प्रमाणे नाव पुकारत अर्जदारांना आत प्रवेश देण्यात आला.अर्ज छाननी प्रक्रियेत 76 उमेदवारी अर्जातून 31 अर्ज अवैध व 45 अर्ज वैध ठरले तथा भावी लढतीचे चित्र 13 डिसेंबरच्या माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.सोयगाव : प्रभागातील 17 जागांसाठी एकूण 90 अर्ज प्राप्त झाले होते.त्यापैकी 4 प्रभागात ओबीसी आरक्षणाची स्थगती आल्याने 14 अर्ज वगळता 76 उमेदवारी अर्जातून 31 अर्ज अवैध व 45 अर्ज वैध ठरले.
एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करने, एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक पक्षांचे चिन्ह लिहून सूचक केवळ एकच देत ये बी फार्म व्यतिरिक्त असलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी एस आर मोरे आणि सहाय्यक अधिकारी रमेश जसवंत मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, नायब तहसीलदार व्ही टी जाधव,कार्यालयीन अधीक्षक ईश्वर शिमरे यांनी ही प्रक्रिया पार पाडली.
प्रभागा प्रमाणे नाव पुकारत अर्जदारांना आत प्रवेश देण्यात आला.अर्ज छाननी प्रक्रियेत 76 उमेदवारी अर्जातून 31 अर्ज अवैध व 45 अर्ज वैध ठरले तथा भावी लढतीचे चित्र 13 डिसेंबरच्या माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.