शिक्षकसेना च्यावतीने बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी गुण गौरव व गुरुगौरव सत्कार सोहळा संपन्न
सोयगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना परिवारा च्यावतीने जि.प. प्रा शा वरखेडी बु. केंद्र फर्दापुर येथे विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार, शिक्षक गुरू गौरव पुरस्कार, शिक्षक सत्कार, विविध स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, विविध पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार व सर्व मान्यवर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून मॉं साहेब जिजाऊ छत्रपती शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेबआंबेडकर, सावित्रीबाईफुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर जगदीश शेलवडकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सुभाष शिंदे यांनी शिक्षकसेना सोयगाव अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडुन जसे वृक्षारोपण, शिक्षकभगिनीसाठी काढलेला विमा व शिक्षकांच्या विविध समस्या सोडवल्याचे सांगुन आजच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर कोरोना कालावधीमध्ये अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया सहज आणि सुलभ व्हावी यासाठी तालुक्यातील सर्व आदरणीय केंद्रप्रमुख त्याचप्रमाणे केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन ऑफलाइन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहित केले. यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना कालावधीत चेक पोस्ट, लसीकरण, सर्वेक्षण अशा विविध कामगिरी आमच्या शिक्षक बांधवांनी पार पाडल्या. त्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दिपक पवार जिल्हाध्यक्ष शिक्षकसेना संभाजीनगर यांनी सोयगाव तालुका शाखेच्या कार्याविषयी गौरवोरोद्गार काढले. पुढिल काळात जिल्हा शाखा आपल्या मागे ऊभी राहील याची ग्वाही दिली.
तद्नंतर गटशिक्षणाधिकारी लोहार यांनी शिक्षकसेनेने हा शैक्षणिक उपक्रम घेऊन चांगला एक पायंडा पाडला. त्याबद्दल शिक्षकसेनेचे कौतुक केले तर भविष्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते जगदीश राठोड, संचालक अमृतेश्वर शिक्षक पतसंस्था यांनी व मदन गायकवाड मुख्याध्यापक देव्हारी यांनी शिक्षकसेनेत जाहीर प्रवेश करण्यात केला.
कार्यक्रमासाठी आदरणीय गोपीचंद जाधव जि प सदस्य संभाजीनगर, गटशिक्षणाधिकारी लोहार, जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना दिपक पवार संभाजीनगर, जिल्हा पदाधिकारी संभाजीनगर संजय जोशी, चव्हाण, पाटील सोमवंशी सळ सर्व संचालक शिक्षक पतसंस्था कन्नड हे मान्यवर तसेच शिक्षक सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा पोळ, राजेंद्र सपकाळे, व्ही पी बावस्कर, त्याचप्रमाणे विठ्ठल पाटील, रवींद्र साळुंखे, वासुदेव कोळी, मंगल सिंह पाटील, खराटे, विजय जाधव, खान, भास्कर मोहिते, मुख्याध्यापक पळासखेडा भीमराव सुरवाडे, मोहन महाजन, एस टी भोलाने, सुभाष सोमा जाधव, सुदर्शन चौधरी, केंद्र संघटक सोयगाव मोतीराम जोहरे, सोयगाव केंद्रप्रमुख आर एल फुसे, केंद्रीय मुख्याध्यापक सोयगाव, आनंदा इंगळे मुख्याध्यापक प्रशाला सोयगाव, ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल ठाकूर, अशोक पवार, रवींद्र तायडे, गिरीश जगताप, कार्याध्यक्ष शिक्षक सेना सोयगाव, अनिल गुप्ता, बाळासाहेब सुळ, केंद्रीय मु जरंडी, महेश गवांदे, डोंगर सिंग राजपूत, एमडी सोनवणे, ज्येष्ठ मार्गदर्शक, हिरास महिला आघाडी सदस्य, दयानंद बाजुळगे तालुका संघटक, मदन गायकवाड मुख्याध्यापक देव्हारी, श्रीजय वाणी तालुका उपाध्यक्ष, जनार्दन साबळे मुख्याध्यापक डाभा, एल ए राठोड मुख्याध्यापक, विठ्ठल सिंग पाटील प्रसिद्धीप्रमुख, आर यु पाटील, आनंदा वारांगणे ज्येष्ठ साहित्यिक, नितीन राजपूत केंद्रप्रमुख, विकास पवार सर केंद्रीय मु अ, अरुण पाटील मुख्याध्यापक, सुभाष परदेशी जिल्हा पदाधिकारी सेना, आर डी सोनवणे, जगदीश राठोड, प्रेमदास पवार, महादू नगरे, समाधान चोपडे, जानगवळी, उबाळे योगेश, दामू अण्णा बागुल माजी जि प सदस्य भगवान धनेधर, ज्ञानेश्वर कायस्थ, कपिल जाधव, कैलास चौधरी, सचिन पाटील केंद्रप्रमुख, दादा संसारे, रतिलाल सावळे, शामकांत शिंदे, जयदीप ठाकरे, ललित कुमार सोनवणे, उमेश महालपुरे केंद्रप्रमुख, पंकज सोनवणे, किरण गढरी, विनोद परदेशी, सतीश महाजन, प्रमोद जाधव, अनमोल शिंदे, सुनील बयास संजय चौधरी, स्वप्निल सुर्यवंशी, निकोसे राजकुमार केंद्रप्रमुख, नानासाहेब मोरे मुख्याध्यापक, राजेन्द्र नगरे केंद्रीय मुख्याध्यापक, सुरेश पावरा, भाऊसाहेब पाटील तालुका संपर्क प्रमुख, सुभाष शिंदे ज्येष्ठ मार्गदर्शक, परमानंद जयस्वाल तालुका अध्यक्ष जुनी पेन्शन हक्क लढा शिक्षक सेना, जिल्हा प्रतिनिधी संजय जोशी संचालक शिक्षक पतसंस्था कन्नड, चव्हाण संचालक शिक्षक पतसंस्था कन्नड, पाटील संचालक शिक्षक पतसंस्था कन्नड, सोमवंशी संचालक शिक्षक पतसंस्था कन्नड उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका अध्यक्ष रविंद्र शेळके, शिक्षक सेनेचे शिलेदार रमेश भोलाने, रविंद्र बसैये, विजय सोनवणे तसेच तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमान जगदिश शेलवडकर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले. शेवटी पोळ यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.