आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार
चोपडा (विश्वास वाडे) महात्मा गाँधी शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात चोपडा तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हंटल आहे.

या मेळाव्याला काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका शैलेजादेवी निकम, जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. सुरेश पाटील, काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, तालुका अध्यक्ष प्रा प्रदीप पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, अजबराव पाटील, नंदकिशोर सांगोरे,
काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर पक्ष पातळीवर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून दौरा आखला आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आहे. पक्षाचा कार्यक्रम खेडोपाडी पोहोचवण्याचा बाबतीत आयोजन याठिकाणी केलं होतं. काँग्रेस आगामी निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या काँग्रेसने स्वतःच्या ताक्तीवर स्वबळावर लढवायचे आहे परंतु कार्यकर्त्यांना ज्याठिकाणी असं वाटते की आघाडी केली गेली पाहिजे. त्याठिकाणी समविचारी पक्षासोबत केली जाईल परंतु सर्वदूर आमचा प्रयत्न हाच आहे की स्वबळावर पुढचे निवडणूक लढणार आहेत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटले.



