ब्रेकिंग

धुळे पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना केली अटक ; सात दुचाकी जप्त

धुळे (प्रतिनिधी) शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून दोन लाख १० हजाराच्या ७ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सुचनाप्रमाणे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सतत पेट्रोलींग, नाकाबंदी दरम्यान वाहन डिटेन करुन संशयित सोहम सुरेश पाटील (वय.२४.रा.स्वामी नारायण कॉलनी पवन नगर,धुळे) व शुभम प्रकाश गोरे (वय२२ रा.रामचंद्रनगर कॉटन मार्केट मागे, धुळे) हे चोरीची मोटार सायकल वापरत असल्याचे निष्पन्न झाले. मोटार सायकल ही धुळे मध्यवर्ती बसस्थानक येथुन चोरल्याचे निष्पन्न झाले. मोटार सायकल चोरीबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन या गुन्हयात दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी एकुण ७ मोटार सायकल मोटार सायकल काढुन दिल्या. त्यांची किमत २ लाख १० हजार इतकी आहे. तपास पोना वाडीले करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व शोध पथकाचे एएसआय नाना आखाडे, पोहेकॉ दिपक गायकवाड, पोना वैभव वाडीले, पोकॉ मनिष सोनगिरे ,प्रविण पाटील, तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, शाकीर शेख, किरण भदाणे, सचिन पगारे यांनी केली आहे. तसेच चोरीस गेलेल्या मोटार सायकलीबाबत नागरिकांनी पडताळणीकामी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क करावा, असे आवाहन निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे