उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते विविध विकास कामांचे उदघाटन संपन्न
पानवदोड येथील जुई नदी तर डोंगरगावच्या भोरडी नदीवर होणार पुलाचे काम
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने तालुक्यातील पानवडोद खु. पानवडोद बु. या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील जुई नदीवर पूल बांधकामासाठी जवळपास २ कोटी ५० लाख, डोंगरगाव येथे डोंगरगाव ते परदेशी वाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी ७७ लाख तर अन्वी – डोंगरगाव रस्त्यावरील भोरडी नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ४ लाख अशा एकूण ५ कोटी ३१ लाख रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन संपन्न झाले.

पावसाच्या दिवसांत पानवडोद येथील जुई नदी व डोंगरगाव येथील भोरडी नाल्याला पूर येत असल्याने पाणी कमी होई पर्यंत येथे विलंब करावा लागत होता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांपासून प्रलंबित ही समस्या आता दूर होणार आहे. असे स्पष्ट करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने मतदारसंघात विकास कामांसोबत प्रमुख रस्ते व पुलांची कामे होत असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याप्रसंगी केले. विकास कामांच्या उदघाटन निमित्त युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे पानवडोद खु. व बुद्रुक तसेच डोंगरगाव या गावांमध्ये गावकऱ्यांच्या वतीने ढोलताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत सत्कार करण्यात आले.
यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किशोर मराठे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, निजाम पठाण, डोंगरगावचे माजी सरपंच उमर खा पठाण, शिवना येथील मुरलीधर काळे, राजू बाबा काळे, सुधाकर काळे, सिल्लोड चे नगरसेवक विठ्ठल सपकाळ, राजू गौर, शेख सलीम हुसेन, अकिल देशमुख, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, यांच्यासह पानवडोद खु. चे सरपंच गजानन पन्हाळे, उपसरपंच विजय गाढेकर, बालाजी गावंडे, नारायण गावंडे, साहेबराव मगरे, विजय बोडखे, महेंद्र सुरडकर, गजानन दौड, पानवडोद बु. येथील उपसरपंच प्रमोद दौड, उदय बिरारे, कैसर सय्यद, प्रभाकर दौड, भारत दौड, सुभाष दौड, गजानन वैद्य, डोंगरगाव येथील उपसरपंच फारूक पठाण, कासम पठाण, विनोद गायकवाड, लक्ष्मण सपकाळ, सत्तार खा पठाण, भागाजी सागरे, इस्तीयाक देशमुख, श्रीरंग आगे, बुऱ्हाण पठाण, सत्तार खा पठाण, अमरसिंग राजपूत, नशीब खा पठाण, सुरेश हिवाळे, वकील पठाण, राजू सरोदे आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.



