महाराष्ट्र

बेवारसांच्या मदतीला धावली माणुसकी समुहाची टिम

सोयगाव पोलीसांनी व माणुसकी समुहाने मनोरुग्णास केली मदत

सोयगाव (विवेक महाजन) येथील बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णास दाढी-कटिंग स्वच्छ आंघोळ घालून नवीन कपडे परीदान केले. व माणूस बनविण्यासाठी माणुसकी समूहाच्या टीमने व सोयगाव पोलीसांनी मदत केली.

तो मनोरुग्ण गेल्या तीन ते चार वर्षापासून सोयगाव येथील बसस्थानक शिवाजी चौक अशा विविध ठिकाणी मनोरूग्ण अवस्थेत फिरत होता कधी कधी हायपर झाल्याने तो लोकांना दगडही मारत होता. ही बाब वकील आर एस महाजन साहेब यांनी पोलिसांना दिली व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित यांना सदरील मनोरुग्ण विषयी माहिती देऊन सोयगाव येथे बोलावले व सदरील रुग्ण हा बाहेर राज्यातील असून तो यू पी येथील राहणार आहे. त्याला समाजसेवक सुमित पंडित यांनी दाढी केस कापून स्वच्छ आंघोळ घालून त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मला कुणी तरी ट्रकमध्ये बसून ट्रक वाल्याने इकडे सोडले आहे. मला घरी जायचे आहे पण माझा दिमाग काम करत नाही. मला काहीही समजत नाही असे त्यांच्या संवादातून कळाले. सदरील मनोरुग्णाला समाजसेवक सुमित पंडित यांनी अश्या मनोरुग्णांच्या सांभाळ करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधला आहे व तिथे त्याची अन्न वस्त्र निवारा या व्यवस्थेसाठी माणुसकी समूहाचे टीम प्रयत्न करीत आहे. या सामाजिक कार्यात सहाय्य्क पोलीस निरिक्षक सुदाम शीरसाठ, उपपोलीस निरिक्षक सतीष पंडित, एस आर महाराज महेश राऊत, योगेश राऊत, अतुल सोनवणे, दैवैद्र पंडित, भगवान पंडित, ज्ञानेश्वर येलीस, विष्णू पंडित व सोयगाव येथील माणुसकी समुहाच्या टीमने मदतकार्य केले.

एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्णास दिला न्याय

एक सामाजिक दायित्व व कर्तव्य स्वीकारणारे याचं उत्तर माणुसकी शिवाय दुसरं काय असेल. तो मानसिक आजाराने पीडित आहेत. हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात. आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला, जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत. तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे