कै. माजी सैनिक भागवत पाटील यांचा मुलीने स्वतःच्या लग्नात वडिलांचा टॕच्यू बनवून घेतला आशीर्वाद !
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील नांद्रा पापा की लाडली बेटिया असे म्हटले जाते व मुली ही तशाच प्रेमाने वडिलांनावर प्रेम करत असतात. मागील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होत्याच नव्हते होऊन अनेक कुटूंबाचे कुटूंब घरचा आपला कर्ता पुरुष गेल्याने उध्वस्त झालेत. अशाच प्रकारे नांद्रा येथे ही अनेक चांगले व्यक्तिमत्त्व अचानक हरपले.
त्यामध्येच नांद्रा येथील चार मुलींचे एकटे खंबीर आधारस्तंभ असणारे (मुलगा नाही), सदाचारी व नेहमी हसतमुख व्यक्तिमत्त्व माजी सैनिक भागवत पाटील यांचे अनपेक्षित कोरोनात निधन झाले. त्यांना चार मुलीं पैकी दोनच मुलींचे लग्न झालेले व दोन मुलींचे लग्न बाकी असताना, त्या कुटूंबावर मोठा आघात झाला व या कुटूंबावर नियतीने क्रूर आसा अन्याय केला. अशा भयान परिस्थितीत त्यांच्या पत्नी शाॕक झाल्या. त्यावेळेस त्यांना त्यांचे दोघे जवाई जे आर्मी व इंजानियर आहेत. त्यांनी घरातील मुलाची जवाबदारी पेलून त्या कुटूंबाला कसेतरी सावरले व आज कै.भागवत फौजी यांच्या तिसऱ्या मुलीचे लग्न, वडिलांना मोठ्या थाटामाटात करायचे होते. पण ते स्वप्न ते उराशीच घेऊन ते अचानक या कुटूंबातून निघून गेल्याने त्यांची स्मृती कायम मुलींना आपल्या घरात दरवडावी व आपले वडील आपल्यातच असल्याची जाणिव व्हावी म्हणून त्यांचा मोठा सिल्व्हर चेअर वरचा सुमारे दोन लाख किंमतीचा टॕच्यू (पुतळा) बनवून लग्नात त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेतला व त्यांना डबडबल्या पणावलेल्या डोळ्ंयानी श्रद्धांजली अर्पण करुन वडील त्यांच्या सोबतच असल्याची जाणिव करुन घेतली. याप्रसंगी आलेले सर्व नातेवाईक, वर्हाडी यांचे डोळे ही पाणावूण खरंच वडिलांच्या लाडल्या मुलीच असतात व मुलींचे वडिलांवरचे हे सर्व प्रेम पाहून सर्वांना गहिवरुन आले.