महाराष्ट्र

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पळशी, केऱ्हाळा व कायगाव येथे रस्ता कामाचे उदघाटन संपन्न

सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा व कायगाव येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून ४ कोटी ३५ लाख तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत पळशी येथे रस्त्याच्या विकासासाठी २ कोटी रुपये असे एकूण जवळपास ६ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. या मंजूर कामांचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले.

शासनाच्या विविध विभाग अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील प्रमुख व गावांतर्गत रस्त्याच्या विकासासाठी मंजुरी मिळालेली असून येत्या सहा महिन्यात मतदारसंघातील एकही रस्ता विकासापासून वंचित राहणार नाही असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रस्ता कामाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केला. तसेच शेत शिवार व पानंद रस्त्याच्या विकासासाठी रब्बी हंगामातील पिके निघाल्यानंतर विशेष मोहीम राबविणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, अक्षय मगर यांच्यासह कायगाव येथे श्री कपालेश्वर संस्थानचे पठाधिश कृष्णागिरी महाराज, संरपंच पाडुरंग जैवळ, उपसरपंच विश्वास दाभाडे, चेअरमन विठ्ठल जैवळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बबनराव दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य राजेद्र खरात, भाउसाहेब जैवळ, अमोल खेत्रे, बबन खरात, रामराव इंगळे, पुंडलिक भोकरे, मुरलीधर जैवळ, बाळा भोकरे, केऱ्हाळा येथे सरपंच सविता दत्ता कुडके, उपसरपंच बिना बी. मुकिम खा पठाण, सुधाकर महाराज पांढरे, जगन्नाथ महाराज पवार, माजी उपसरपंच दत्ता कुडके, संतोष पांढरे, विनायक पांढरे, अर्जुन वाघ, हकिम पठाण शेख ईसा, समाधान पांढरे, कृष्णा पांढरे, शिवाजी कुमावत, लक्ष्मण दूधे, दत्ता पांढरे, सांडू खा, गणी पटेल, प्रभाकर हाडोळे, देविदास पांढरे, पुंजाराम दारुंटे, सतीश राजपूत, संपत पांढरे तर पळशी येथे चेअरमन विठ्ठल बडक, गोपाल राजपूत, रत्नाकर बडक, दीपक बडक, रमेश बडक, सत्तार बेग, दत्ता बडक, शेख एजाज, रामेश्वर राऊत, ताहेर बेग, अनिस शहा, शिवाजी बडक, उपळीचे माजी सरपंच रामराव फोलाने, काकासाहेब सुल्ताने, भगवान जाधव, संजय खिल्लारे, सदाशिव बडक आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे