शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा मतदार संघातील २८१ शेतकऱ्यांच्या सपत्नीक सत्कार
राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसेंनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सत्कार करत दिला मदतीचा आधार
दोंडाईचा (प्रतिनिधी) भारताचे कृषिमंत्री तथा शेतकऱ्यांचे कैवारी, जाणता राजा शरदचंद्र पवार यांच्या आज होत असलेल्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष संदीप बेडसे यांनी शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील २८१ शेतकरी बाधवांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम आयोजित करत मदतीचा हात पुढे केला आहे.
शिंदखेडा मतदार संघातील प्रत्येक गावातून सर्व समाजातील तसेच कुठलाही पक्ष व शेती कमी असो की जास्त हा भेदभाव न करता फक्त शेतीत दिवसरात्र मेहनत करणारा शेतकरी असा निकष ठेवत शेतकऱ्यांची कार्यक्रमासांठी निवड करण्यात आली होती. ह्या कार्यक्रमात मतदार संघातून एकूण २८१ शेतकरी बंधूंना सपत्नीक शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो असलेली घड्याळ व महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आली. शरदचंद्र पवार यांचे कृषी क्षेत्रातील धोरण डोळ्यासमोर ठेवून भारतात शेतकरी जगला पाहिजे, म्हणून शेतकरी वर्गाला प्राधान्य देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात धुळे जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे व धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख अध्यक्षस्थानी असून सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी वक्ता सेलचे राज्य प्रमुख लक्ष्मण कांबळे व प्रदीप सोळंके, माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व दोंडाईचा नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब रवींद्र देशमुख, एन.सी.पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश महाजन, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिसोदे, युवक प्रदेश सचिव सुमित पवार, शिंदखेडा तालुका अध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य ललित दादा वारुडे, पंचायत समिती सदस्य भगवान भिल, भाग्यश्री पाटील, ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष दीपक जगताप, दोंडाईचा शहराध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, कृ.उ.बा.माजी सभापती विठ्ठल सिंग गिरासे, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक गिरासे, आधार आबा पाटील, मोतीलाल पाटील, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संचालक अमित पाटील, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, युवक कार्याध्यक्ष कमलाकर बागले, यु.विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, ओबीसी सेलचे ईश्वर माळी, माजी नगरसेवक रहीम मन्सुरी, उपाध्यक्ष निखिल पाटील, शिंदखेडा शहर उपाध्यक्ष मिलिंद देसले, दर्पण पवार,चेतन देसले, आनंदराव पाटील, महेंद्र पाटील, मित्तल बेहरे, राकेश बेहेरे, योगेश पाटील, भुषण माळी, मोहन पाटील, राहुल माळी, डॉ. दीपक पाटील, कपिल पाटील, पंकज सोनवणे, बाळा पवार, छत्रपाल पारधी, महेंद्र सिसोदे, मुन्ना सिसोदे, गणेश पाटील, श्याम पाटील, प्रदीप बागल, प्रकाश पाटील, सुरेश अहिरराव, राजेंद्र पाटील, रविबापु, दिनेश जाधव, राहुल कोळी, शानाभाऊ कोळी आदी उपस्थित होते.