शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल सभेचे आयोजन
पवार यांनी शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना संबोधले
धुळे (प्रतिनिधी) राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व्हर्च्यूअल सभेचे आज सकाळी ११ वाजता अलहेरा हायस्कूल शंभर फूटी रोड येथे आयोजन करण्यात आले होते. व्हर्च्युअल सभेच्या अध्यक्षस्थानी धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले हे होते. यावेळी शरदचंद्र पवार यांनी राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित करतांना पक्षसंघटना बांधणीसाठी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पवार यांच्यावर प्रेम करणारे शहरातील नागरिक जेष्ठ, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेनंतर धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब, गरजूंसाठी भव्य मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. शिबीराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सलाम मास्टर हे होते. सदर शिबीराचे उद्घाटन हे आयुब खाटीक, लल्लू भैय्या, सुनिल नेरकर, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या शिबीरामध्ये कांतालक्ष्मी शाह रुग्णालयाचे तज्ञ व अनुभवी डॉक्टर मोफत डोळेतपासणी व मोफत मोती बिंदूची शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच अल्पदरामध्ये चष्मे देखील उपलब्ध करुन दिले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. असंख्य नागरिकांची नेत्रतपासणी यावेळी करण्यात आली. तसेच गरजू, गरीब नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे.
सदर कार्यक्रमाला कैलास चौधरी, सुमित पवार, नंदू येलमामे, नवाब बेग, रईस काझी, उमेर अन्सारी, अकिल अन्सारी, शकील ईसा, कमदेश देवरे, नितीन चौधरी, जितेंद्र शिरसाठ, वसीम मंत्री, मुक्तार मन्सूरी, मंगेश जगताप, हाशिम कुरेशी, कुणाल पवार, जितू पाटील, जयदिप बागल, गिरीष भामरे, सरोजताई कदम, ॲड.तरुणा पाटील, जमीर शेख, सलीम लंबू, योगिता गिरासे, राज कोळी, मनोज कोळेकर, यशवंत डोमाळे, ज्ञानेश्वर माळी, राजेंद्र सोलंकी, राजेंद्र चौधरी, रजनिश निंबाळकर, संजय सरग, शकीला बक्ष, जया साळूंखे, जगन ताकटे, तोईश सोनार, आनंद पाटील, स्वप्निल पाटील, कुणाल बुदेकर, दानिश पिंजारी, प्रसाद महाले, दत्तू पाटील, कार्तिक मराठे, सागर चौगुले, असलम खाटील, प्रणव भोसले, प्रसाद दाळवाले, आयुष काकडे, शुभम देवरे, स्वामिनी पारखे, कृष्णा गवळी, बंटी गवळी, मयुर शेख, मोनिश पाटील आदी कार्यकर्ते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबीराचे आयोजन अमीत शेख, रोहन शेख, शाहिद पापा कुरेशी, जुनेद पठाण, जावेद बेग, आसिफ शेख, असद खाटीक, अशफाक मिर्झा यांनी केले होते.