महाराष्ट्रराजकीय

शरद पवारांची बदनामी करणाऱ्या केतकी चितळेवर गुन्हे दाखल करा ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळे : शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणातील एका कवितेचा व्हिडीओ एडिट करुन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून शरद पवार यांची बदनामी करणाऱ्या केतकी चितळे व भाजपच्या आयटी सेलवर तात्काळ गुन्हा दाखल करणाऱ्या मागणीसाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाच्या वतीने आंदोलन करुन अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांना निवदेन देण्यात आले.

कालपासून समाज माध्यमांमध्ये भाजपाचे कार्यकर्ते व भाजपाचे आयटी सेल त्यांच्या नेहमीच्या अपप्रचार करण्याच्या तंत्रानुसार शरद पवार यांच्या विषयी खोटारडा प्रसार प्रचार करीत आहेत. भाजपाच्या ट्विटर अकाउंट वरून पवार यांच्या भाषणातील एक छोटासा व्हिडिओ प्रसारित करून पवार यांच्या विषयी लबाड आणि थोतांड प्रचार करीत, पवार यांच्या हिंदू देवता विषयी वाईट बोलत आहेत. असे लबाड सांगत आहेत. पवार यांच्या दोन दिवसापूर्वी सातारा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या भाषणात “पाथरवट” या कवितेचा आशय सांगितला आहे. त्या कवितेचा उल्लेख करताना कष्टकऱ्यांची, वंचित घटकाची वेदना मांडताना “कवी जवाहर राठोड” यांनी केलेल्या कवितेचा आशय सांगत आहेत की, पाथरवट जात दगडाला आकार देऊन शिल्प करते, ती धान्य दळणारे जाते तयार करते, पाथरवट देवांची मूर्ती तयार करतो पण देवळाच्या गाभार्‍यात ती मूर्ती बसल्यास त्याला पूजनाचा अधिकार मात्र दिला जात नाही. तेव्हा तो प्रश्न उपस्थित करतो ‘मी त्या मूर्तीचा निर्माता असताना मला परत त्या मूर्तीकडे जाण्याचा अधिकार का नाही..?’ तसेच पुढे जाऊन कष्टकऱ्यांच्या वेदना व पुढील वाटचाली बद्दल या समाज व्यवस्थेला लोकशाही मार्गाने आव्हान उभं करण्याचा एक विचार या कवितेत कवीने मांडलेला आहे.

सदर कवितेचा छोटा भाग व व्हिडीओ एडिट करुन भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. शरद पवार यांच्या बदनामी करुन हिंदू देवदेवतांच्या विरोधात आहेत. असा अपप्रचार करीत आहेत. यामुळे राज्यांमध्ये जातीय तेढ निर्माण होवू शकते. तरी फेसबुक व व्हॉटप्सप वर चुकीचे संदेश फिरवणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करीत आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अशांना ठोश्यांनी उत्तर देतील. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्यांनी आंदोलन करुन अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवदेन देवून केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाठ, हाजी हाशिम कुरेशी, यशवंत डोमाळे, सरोजताई कदम, तरुणा पाटील,प्रमोद सांळूखे, संजय सरग, हेमकांत पाटील, जमीर शेख, रईस काझी, संतोष गायकवाड, उमेश महाले, ज्ञानेश्वर माळी, जगन ताकटे, किरण बागूल, वाल्मीक मराठे, असलम खाटीक, राज कोळी, हिमाणी वाघ, इरफान पठाण, निखिल मोमाया, पिर मोहम्मद शाह, बरकत अली, शेख एजाज, दिपक देवरे, सलीम शेख, अब्दूल कादीर, सोनू घारु, चेतना मोरे, प्रसाद दाळवाले, निलेश चौधरी, भूषण पाटील, शेख अमित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे