महाराष्ट्र
सेवानिवृत्त व्यवस्थापक हरिभाऊ पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन
सोयगांव (विवेक महाजन) सोयगांव तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक हरिभाऊ ओंकार पाटील (वय ८४) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर उद्या दि. १५ रोजी सकाळी अकरा वाजता सोयगांव अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे. सोयगांवचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांचे ते वडील होते.