महाराष्ट्र

साक्री तालुक्यामध्ये पारंपारिक आदिवासी पद्धतीने लग्न सोहळा संपन्न

आदिम सोहळ्याचे दुर्मिळ योग

साक्री (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमोडे गाव एक आदिवासी संस्कृतीचे अद्धत दर्शन घडविणार आहे. ही संस्कृती जतन करून ठेवावी म्हणून आप भिला लाल सूर्यवंशी यांचा मुलगा मंगलदास सूर्यवंशी व आप प्रकाश वामन जगताप यांची मुलगी शकुंतला जगताप यांनी आदिवासी पद्धतीने आदिम लग्न केले. याहा मोगी माता, कणसरा माता व डोंगऱ्यादेवाच्या साक्षीने हा लग्न सोहळा पार पडला.

आदिवासी दैवत, मातृ -पितृ,आदिवासी क्रांतिकारकांचे प्रतिकाचे ओळीत मांडणी करून धान पुजा आदिवासी बचाव अभियान संस्कृती संवर्धक आप कवी रमेश भोये यांनी उत्तम अशी आदिवासी प्रतिकांची आरास मांडून संपूर्ण पूजन पार पाडले. तसेच आप कवी रोडू चौधरी यांनी आदिम मांडवमंत्र म्हणून लग्न लावले. तदनंतर आप रमेश भोये यांनी नवरा – नवरीचे मामा, आई -वडील यांच्या कडून नवरीच्या पदरात कणी- कणसरा धान देण्यात आले व पुढे त्याने म्हटलं की, धन संपदा लाभो, वन संपदा लाभो, कणी कणसरा लाभो, बरकता मिळो, बाळ-गोपाळाचा पाळणा हलूदे असे म्हणून पुढील भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आप रावण चौरे (आदिवासी बचाव अभियान नाशिक जिल्हा अध्यक्ष) यांनी आदिवासी परंपरा, संस्कृती विषय थोडक्यात माहिती दिली. आपण आदिवासी संस्कृती जपायची असेल तर आपली संस्कृती जोपासली पाहिजेल. आपले सगळे आपले कार्य आदिवासी परंपरेनुसार केले पाहिजे.आपण आपल्या आदिवासी समाजात आपली संस्कृती सगळीकडे प्रचार – प्रसार केली पाहिजे. आदिवासी हा निसर्ग पूजकच आहे. कारण अनुकरणाच्या नादात मुख्य प्रवाहात आलेला प्रगतीच्या झोतात मार्गक्रमण करणारा माणूस आपले दैवत, संस्कृती, भाषा विसरत आहे. म्हणून आपण आपली संस्कृती जोपासू व ती पुढे घेऊन जावू. अशा पद्धतीने आलेल्या पाहुणे मंडळींना त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी आमोडे गावातील सरपंच अंजना पितांबर गवळी, पोलीस पाटील योगेश पितांबर साबळे, ग्रामपंचायत सदस्य, तसेच माजी खासदार बापू चौरे, विद्यमान आमदार मंजुळाताई गावित (साक्री मतदार संघ), डॉ. तुळशिराम गावित (शिवसेना प्रमुख धुळे जिल्हा), आदिवासी बचाव अभियानाचे आप मांगीलाल गांगुर्डे (केंद्रीय संघटक), प्रतिभाताई चौरे (केंद्रीय महिला संघटक), आप तानाजी बहिरम (जिल्हा अध्यक्ष, धुळे जिल्हा), आप तुकाराम बहिरम (कार्याध्यक्ष, धुळे जिल्हा), आप राजेंद्र बहिरम (सह -सचिव, धुळे जिल्हा), आप गणेश गावित (तालुका प्रमुख साक्री), सगे -सोयरे, आपतेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठे संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे