महाराष्ट्रराजकीय

राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी, शेतमजूर, सामन्यांच्या पाठीशी : राज्यमंत्री अब्दुल सत्तार

केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचा घेतला जोरदार समाचार

भोकरदन (विवेक महाजन) अन्वा ता.भोकरदन येथील ग्रामविकास विभागअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. तसेच सामाजिक उपक्रम अंतर्गत अन्वा तसेच परिसरातील दिव्यांग बांधवांना टेबल फॅनचे वाटप राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर तसेच माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश पा. गव्हाड, शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ दौड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, अब्दुल रउफ, मंजितराव पांडव आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते.

भोकरदनच्या रखडलेला विकासावरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचा समाचार

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनहितार्थ निर्णय घेवून राज्यात सर्वसमावेशक विकास साधत आहे. भाजपला त्यांच्या सत्ता काळात हे जमले नाही, भोकरदनला येताच पाहिले रस्त्यातील गड्डे स्वागत करतात अशा कोपरखीळ्या मारत भोकरदनचा रखडलेल्या विकासावरून महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या खास शैलीत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जोरदार समाचार घेतला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या पाठीशी

तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालविणे इतके सोपे नाही मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी ही किमया करून दाखविली. त्यांच्याच नेतृत्वाखाली आता देशभरात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. जनहितार्थ काम करण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे देशातील क्रमांक एक चे मुख्यमंत्री ठरले आहेत. भाजप केवळ जातीवादाचा मुद्दा पुढे करून त्याआड सामान्यांच्या प्रश्नांपासून दूर राहत आहे. तर दुसरीकडे राज्यसरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्ज माफी, कोरोना काळात विविध उपाययोजना राबवून विकास कामे साधत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

”गद्दारोकी सजा वक्त पे दिया जाती है”

मी रावसाहेब दानवे यांना मदत केली हे जगजाहीर आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली हेही जगजाहीर आहे असे सांगून ”गद्दारोकी सजा वक्त पे दिया जाती है” असा गर्भीय इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आपल्या भाषणात दिला.

शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि.प. सदस्य नवनाथ दौड यांनी प्रास्ताविकपर भाषणात अन्वा गटात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. तर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी भोकरदनचा रखडलेला विकास व येथील नागरिकांसमोरील प्रश्न मांडले. भाजपच्या सत्ताकाळात सामान्यांचा छळ होत असून भाजपच्या नेत्यांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भोकरदनच्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासह येथील विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे