चोपडा
डॉ. जय जाधव याचे सुयश
चोपडा (विश्वास वाडे) डॉ. जय चंद्रकांत जाधव याने जुलै २०२१ मध्ये रशिया येथून MBBS ची वैद्यकीय पदवी प्राप्त केली. तद्नंतर १२ डिसेंबर २०२१ रोजी Medical Council of India (MCI)तर्फे भारतात घेण्यात आलेल्या पदवी पात्रता परीक्षेत प्रथम श्रेणीत व प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला.
डॉ. जय जाधव हा पंकज विद्यालयाचा विद्यार्थी असून मूळचे आडगाव येथील चंद्रकांत जाधव (प्राथमिक शिक्षक, पंकज विद्यालय, चोपडा) यांचा चिरंजीव आहे. त्याच्या सुयशाबद्दल पंकज शैक्षणिक संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले संचालक मंडळ, मुख्याध्यापक सर्व सहकारी शिक्षक व हितचिंतक यांच्याकडून त्याचे व जाधव परिवाराचे अभिनंदन होत आहे.