पहिल्याच दिवशी नगरपालीका प्रशासकपुढे अनेकांनी मांडला चुकीच्या कामांचा पाढा
शिवाजी स्मारक परिसरातील व्यवसायिकांनी मांडली पोट भरण्याची कैफीयत
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथील दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेवर नुकतेच शासन निर्णयानुसार २८ डिसेंबर रोजी सत्ताधारी गटाचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकीय अधिकारी म्हणून दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेचा कारभार शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैदांणे यांनी काल दिनांक २९ डिसेंबर रोजी स्विकारला आहे.
यावेळी पहिल्याच दिवशी गावातील काहिंनी त्यांचे स्वागत केले तर काहींना जी कामे कमीवेळात गावात युद्धपातळीवर सुरू आहेत. ती कशी चुकीच्या पद्धतीने व हम करे सो कायदा,ह्या नियमावली खाली सुरु करण्यात आली आहे, यांची माहिती देत. तसेच नंदुरबार चौफुलीवर शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील काही व्यवसायिकांनी आपण अनेक वर्षांपासुन याठिकाणी पोट भरत असुन, अचानक उदरनिर्वाहाची साधने हटवले गेल्यामुळे कुटूबांचा पोटापाण्याचा प्रश्न सतावत असल्यामुळे, आम्हाला पुन्हा आमच्या जागेवर व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी कैफीयत मांडली, म्हणून आता नुकतेच नव्याने बसलेले प्रशासकीय अधिकारी आपल्या पर्यंत आलेल्या तक्रारींकडे काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. म्हणून मागील पंचवार्षीकला विरोधकांकडून घरकुल प्रकरणाचा भष्ट्राचार काढत, दिवसांगणिक प्रकरण गाजविण्यात-रंगविण्यात आले होते.आता विरोधक ऐवढ्या करोडोंच्या विकास कामात सत्ताधारी गटाविरोधात एखादे भष्ट्राचाराचे प्रकरण काढत गाजवतील का? असाही प्रश्न गावातील सुजाण नागरिकांना पडला आहे.
दोंडाईचा-वरवाडे नगरपालीका पाहिली तर एकीकडे दर पंचवार्षिकला “ब” वर्गात मोडणारी नगरपालीका आहे. मात्र ही नगरपालिका दर पंचवार्षिकला “अ” वर्ग असलेल्या नगरपालीकेंशी विकास कामे व मंत्रालयातुन निधी खेचून आणण्याबाबत स्पर्धा करत असते. मागील दहा वर्षापुर्वी नगरपालीकेत असलेल्या तत्कालीन सत्ताधारी गटाने गावात गल्लोगल्ली-वार्डवाईज शौचालयाचे हजारो सिटस बांधले. स्टेशन भागातील मेनरोडवर-रस्त्यावर थाटलेली अतिक्रमित पत्र्यांची दुकाने काढत.प्रत्येकाला स्वाभिमान जागवत स्वतः च्या हक्काच्या जागेवर व नियमाकुल नगरपालीका-मार्केट कमिटीच्या गाळ्यात वसविले. तसेच गरिबांना पुरवडतील असे केन्द्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातुन घरकुल योजना राबविण्यात आली होती. म्हणून त्यावेळच्या सत्ताधारी गटाला डोळे बंद जरी केले.तरी गावात आपला चौफेर विकास दिसत होता व येणाऱ्या नगरपालीका सत्तेत जनता आपल्याला हमखास पैसे न देता, विकास कामांच्या मुद्द्यावर निवडून देतील, अशी फाजील अपेक्षा त्यांनी बाळगली होती. म्हणून विरोधकांनी त्यांचा हाच फाजील विश्वास लक्षात घेता,फक्त घरकुल प्रकरण टारगेट करत. भष्ट्राचार झाला-भष्ट्राचार झाला, असा टिमका मिरवत कायदेशीर कागदावर उतरवला व रोज उठून गाव बंद करत, गावात वातावरण तापवत, घरकुलात कसा करोडोंचा भष्ट्राचार झाला, अशी छबी खराब करून टाकली होती. मात्र शेवटी हाती काही आले नाही. मात्र विरोधकांना एका मुद्द्यावर नगरपालीका हातात घेता आली. आता ह्या पाच वर्षात सत्ताधारी गटाने कधी नव्हे इतका सरकारकडून करोडोंचा निधी खेचून आणत गावात विविध कामे केली आहेत व त्यांनाही डोळे बंद केल्यावर गावात आपलाच विकास दिवसरात्र फिरत असल्याचे दिसत-भासत आहे. त्यामुळे ही करोडो रूपयांची विविध विकास कामे खंरच रोडावर प्रत्यक्ष अंमलात आली आहेत का, एखाद्याचे हात-खिसे ह्या कामात भरबटलेले आहेत का? नाही. म्हणून विरोधक अनेक कामांपैकी एखाद्या कामातला भष्ट्राचार शोधून काढत, गाजावाजा करत-रंगवत कायदेशीर कागदावर घेतील का? व जशी त्यांनी नगरपालीका हातात घेतली. तसे डावपेच यशस्वी करतील का? असे एक ना अनेक प्रश्न नगरपालीकेवर प्रशासकीय अधिकारी विराजमान झाल्यावर जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.
म्हणून नुकतेच नव्याने विराजमान झालेल्या प्रशासकीय अधिकारी तथा शिंदखेड्याचे तहसीलदार सुनील सैदांणे याच्यांपुढे रोज उठून विविध विकास कामांची माहिती मागणाऱ्या सर्वसामान्यांना तोंड द्यायचे का ? ज्यांची उदरनिर्वाहा़ची साहित्य काढत,रोडावर आलेल्यांना कुटुंब चालवण्यासाठी पुन्हा रोडावर दुकान थाटू द्यायचे का? विरोधक एखादी जटील परिस्थिती तयार करतील त्याला तोंड द्यायचे? असे एक ना प्रश्न दैनंदिन त्यांच्या समोर उभे राहतील. म्हणून पहिल्या दिवशी ही परिस्थिती आहे. तर येणाऱ्या काळात काय परिस्थिती राहील, हे वेळच ठरवेल. ऐवढेच नगरपालीकेवर प्रशासकीय अधिकारी बसलेल्या परिस्थितीवर जनतेला म्हणावेसे वाटत आहे.