म्हसावद गावातील जीवाशी बाजी लावणाऱ्या वाळू वाहतुकीला कोण रोखणार ?
दि.०८जुलै२०२२: जळगांव (प्रतिनिधि) :
जळगांव तालुक्यातील म्हसावद गिरणा पात्रातून बेजबाबदार पणे अन् उर्मटपणा ची भाषा वापरून सर्रास वाळू वाहतूक सुरू आहे. चोर रस्त्याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर अक्षरशः ट्रॅक्टराचे बोनट सह सरळ उभे राहून गेले अन् चालकाच्या जीवाशी येताना दिसले. दैव बलवंत म्हणून बाल बाल बचावले.
असे बघण्याची भूमिका पाहणारे. कट्ट्यावर काही कार्यकर्ता बसून म्हणतात कुठे तरी वाळू थांबायला पाहिजे.
मग बोलण्या पेक्षा कारवाईसाठी पुढाकार का घेत नाही. म्हसावद गावासह ४० चाळीस खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. पूर्ण गाव दूषित पाणी पिताना दिसत आहे. जो तो आपल्या परीने शुद्ध पाणी पिण्याची पद्धत वापरून सुरक्षित राहण्याचे काम करीत आहे पण दूषित पाणी बाबत अन् वाळू उपसा बाबत कोणी कार्यकर्ता कारवाई साठी पुढाकार घेताना कोणी का दिसत नाही.
गिरणा पात्रात जाऊन जरा त्या पाण्याचा वास घेऊन बघा गिरणा पात्रात वाळू नसल्याने पाणीचा दुर्गंध वास येतो याबाबत गांवकरी नी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात आजारांना सामोरे जावे लागेल एवढे मात्र नक्की.