स्मारक-चौक, रस्ते अभावी घर-व्यापार-व्यवसाय तुटणारी जनता मात्र, न्याय मागण्यासाठी न्यायालयात
दोंडाईचा (प्रतिनिधी) संत-थोर-महात्मा-युग पुरुष हे भारतीय संस्कृती इतिहासाचे प्रतिक आहे. यांचे विचार, कुर्ती, पुर्ण आयुष्य सेवाभावी वुत्ती, अन्याय विरोधात व दुसऱ्यासाठी जगणे हे आजही सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. म्हणून आजही ह्या संत-थोर, महात्मा-युग पुरूषांना घराघरात-चौकाचौकात पुजले जाते. तसेच यांचे विचार, प्रेरणा, संघर्ष, जीवनपट लोकांना सदैव आठवण असावा म्हणून भारतात बऱ्याच ठिकाणी म्युझियम, काही ठिकाणी प्रतिकात्मक स्मारके, काही ठिकाणी ग्रंथालय आदी चिरकाल टिकतील अशा देखरेखीखाली सुरु आहे.
त्याच अनुषंगाने दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेने गावात विविध थोर-महात्मा-युग पुरुष यांचे स्मारक, चौक सुशोभिकरणाला गावात महिन्याभराच्या अवधित युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. मात्र या थोर-महात्मा-युग पुरूषांच्या आचार-विचार, दैनंदिन अन्याय-अत्याचार बाबत संघर्ष पाहता. त्यांनी गरिबांवर कधी अन्याय-अत्याचार होऊ दिला नाही. उलट गोर-गरिब, अन्याय ग्रस्ताची आवाज बनून पुर्ण आयुष्य संघर्षात काढले. पण दोंडाईचा शहरात मात्र विपरीत चित्र दिसत आहे.
या थोर-महात्मा-युग पुरूषांच्या स्मारकासांठी गोर-गरिब, हातावर पोट भरणाऱ्यांचे वर्षानुवर्षे असणारे घर, छपरे नगरपालीकेच्या एक नोटीसीत काढायला भाग पाडले जात आहे. म्हणून गावातील जनता एकीकडे विविध चौकात स्मारके-चौक सुशोभिकरण-रस्ते येत असल्याने खुश असली तरी दुसरीकडे ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन दुकान, घर, छत अतिक्रमण म्हणून काढले जात असल्याने त्याचे तर आभाळ फाटुन जिवंतपणीच मेल्याची भावना निर्माण होत आहे. म्हणून त्यासाठी आपले झोपडे का असेना नागरिक कोर्टात न्याय मागण्यासाठी जात आहे व आज त्यांच्या अर्जावर दोंडाईचा न्यायालयात पक्ष ठेवला जाणार आहे. म्हणून दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेने गावात थोर-महात्मा-युग पुरूषांचे स्मारके उभारतांना त्यांचा जीवन कार्याचा स्वतः ही बोध घेत. कोणत्याही गरिबावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत, एखाद्याचे दुकान, घर,छत काढले तर त्याच्या जगण्याची-उदरनिर्वाह करण्याची पर्यायी व्यवस्था ही करायला हवी, असा सुर अन्याय ग्रस्त नागरिकांच्या तोंडून निघत आहे.
आजमितीला दोंडाईचा शहरात नगरपालीकेमार्फत शहादा चौफुली येथे मेक इंडिया चौक, नंदुरबार. चौफुली येथे शिवाजी महाराज यांचे स्मारक, मार्केट गेट समोर गाय-वासरू चौक, स्टेट बँकेजवळ रूपया चौक, जुन्या नगरपलिकेजवळ शहीद अब्दुल हमीद चौकात रणगाडे, डी.आर.बो.ओ.डी.हायस्कूल पुढे स्मारक, गुरव स्टाप येथे वीर महाराणा प्रताप महाराज स्मारक, राणीपुरा येथे आहिल्याबाई होळकर यांचे स्मारक आदी थोर-महात्मा-युग पुरूषांचे स्मारके उभारण्यात येत आहे. तर काही चौकांची कामे झाली आहेत.
म्हणून मे.मुख्याधिकारी यांनी गावात ज्या पद्धतीने युद्धपातळीवर करोडो रूपयांचा निधी आणत विकास कामे करत आहे. तर दुसरीकडे ही विकास कामे करताना कोणा गोर-गरिबावर आपल्या हाती असलेल्या कायद्याने अन्याय तर होणार नाही. यांचीही काळजी घ्यायला हवी. शेवटी गरिबाची झोपडी-टपरी सरकारी जागेवर-रोडावर असेल तर ती अतिक्रमण व तेच श्रीमंत-राजकीय व्यक्तींचा घर-बंगला सरकारी जागेवर- रोडावर असला तरी तो बेकायदेशीर नाही. म्हणजे त्याने सरकारी जमीनीच्या जमीनी शेतसारा भरल्यावर बळकावल्या तर वेगळा न्याय देता कामा नये. ऐवढीच रास्त अपेक्षा सध्याच्या अचानक अतिक्रमण काढण्याच्या पाश्वभुमीवर नागरिकांमध्ये उमटत आहे.