लांबोटी व सावळेश्वर येथे ११कोटी च्या विकास कामाचे भूमीपूजन संपन्न
सोलापूर : लांबोटी व सावळेश्वर येथे ११कोटी च्या विकास कामाचे भूमीपूजन संपन्न झाले आहे.
आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत (तात्या) माने यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे लांबोटीnयेथे सावळेश्वर पोफळी अर्जुनसोंड,लांबोटी शिरापुर रस्तासाठी ३ कोटी ९१ लाख ५३ हजार तर सावळेश्वर येथे बीबी दारफळ सावळेश्वर विरवडे शिंगोली रस्त्यासाठी ७ कोटी १२ लाख २५ हजार असे एकूण ११ कोटी ३ लाख मंजूर निधीतून रस्त्याचे भूमीपूजन आमदार यशवंत (तात्या) माने व राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या शुभहस्ते तर पंचायत समिती सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या*प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी चंद्रहार चव्हाण, सज्जन पाटील, सुनील वाघमोडे, धनाजी गावडे, कालिदास गावडे, प्रल्हाद मामा काशीद,सागरराजे पांढरे, अक्षय खाताळ, दिगंबर मसलकर, मोहन चौगुले, आबा चटके, भारत गुंड, गजानन झेंडगे, भगवान थिटे, सुभाष चंदनशिवे, श्रीनिवास कुंभार इत्यादी उपस्थित होते.