राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्र. १२ मध्ये पदयात्रा
शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे केले अवाहन
सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड शहरातील प्रभाग क्र. १२ (अ) च्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पठाण फातमाबी जब्बारखान यांच्या प्रचारार्थ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रभागात पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. या पदयात्रे दरम्यान मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या उमेदवार पठाण फातमाबी जब्बारखान यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रभाग क्र.१२ मधील होळी गल्ली, गणेश कॉलनी, म्हसोबा गल्ली, बालाजी गल्ली, तेली गल्ली आदी भागात पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, नगरसेवक शकुंतलाबाई बन्सोड, प्रशांत क्षीरसागर, रउफ बागवान, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, मनोज झंवर, रईस पठाण , जितू आरके, जुम्मा खा पठाण, शेख मोहसीन, आरेफ पठाण, अकिल वसईकर ,सुधाकर पाटील, सुनील दुधे, शेख बाबर, मतीन देशमुख, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, जगन्नाथ कुदळ, आशिष कुलकर्णी, धनंजय देशपांडे, संजय मुटकुटे, फहिम पठाण, संतोष धाडगे, दीपक वाघ, डॉ. भूषण बन्सोड, ज्ञानेश्वर कुदळ, अमृतलाल पटेल, कैलास इंगे, पांडुरंग डवणे, जगन्नाथ कुदळ, शेख आबेद, शेख आशक, देवराव भाग्यवंत, नासेर पठाण, गफ्फार सौदागर, रामप्रसाद तसेवाल, शेख हबीब आदींची उपस्थिती होती.