कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदातांचा सन्मान सोहळा संपन्न.
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
दिनांक:- १४ सप्टेंबर २०२२
भुसावळ- रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता असून रुग्ण व उपचार यामधील अमृता सारखा महत्वाचा संजीवनी देणारा देवदूत आहे. भुसावळातील तरुणांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. देशसेवेच्या या कार्यामुळे समाजातील इतर तरुणांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांचा वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे रक्दात्यांचा सन्मान सोहळा आयोजित केले.
रक्तदात्यांमुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे. अनेक वेळा रक्तदाते स्वखर्चाने रुग्णापर्यंत पोहोचून त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले आहेत. त्यांचे कार्य हे अनमोल असून त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप म्हणून आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी शिवसेनेच्या ८० टक्के २० टक्के राजकारण तत्वानुसार परिसरातील ५० रक्तदात्यांचा सन्मान आयोजित केला असे संयोजक उमाकांत शर्मा यांनी समारोपाप्रसंगी सांगितले. सूत्र संचालन तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन,जिल्हा सह समन्वयक उत्तमराव सुरवाड़े,उपजिल्हा संगठक विलास मुळे, तालुकाप्रमुख संतोष सोनवणे,विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन,विधानसभा क्षेत्र संगठक बबलू ब्रहाटे,उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी,शिवसेना शहर प्रमुख हैमंत खंबायत ,दीपक धांडे संतोष माली,शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाल,रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललित मुथा, शहर संगठक योगेश बागुल, उपशहर प्रमुख धनराज ठाकुर, स्वप्निल सावड़े, जवाहर गौर,सोनी ठाकुर,बाळासाहेब भोई,सागर विसपुते,प्रसिद्धि प्रमुख गोकुल बाविस्कार, अमोल भालेराव राहुल सोनवणे, कैलाश अग्रवाल, आदित्य शर्मा, पूजन महाजन, सौरभ शर्मा, कडु पाटिल, यश अग्रवाल संजय ठाकुर, शिवम चौरसिया,राजू इंगले,धिरज वरदोंनकर आदि शिवसैनिक पद-अधिकारी उपस्थित होते.