जातोडे गावातील आदिवासी दफनभूमीतील अतिक्रमण हटविण्यात यावे ; भिल समाज विकासच्या वतीने निवेदन सादर
शिंदखेडा (यादवराव सावंत) धुळे जिल्हय़ातील शिरपूर तालुक्यातील जातोडे गावातील पुर्वपार चालत असल्याने आदिवासी दफनभूमी या जागेवर काही ग्रामस्थानी अतिक्रमण करून सदरील जागेवर कब्जा मिळविण्याचा भविष्यात माणस आहे. म्हणुन शिरपूर तालुका भिल समाज विकासचे तालुका अध्यक्ष भोजु अहिरे यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजातील विविध पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना निवेदन दिले.
निवेदनातुन सदर गावातील आदिवासी समाजातील दफनभूमी ही ग्रामपंचायत मार्फत अधिकृतपणे दिलेली आहे. सदरील जागेवर गेल्या काही महिन्यापासुन गावातील काही ग्रामस्थानी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे दफन करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तरी सदरील अतिक्रमण हटविण्यात यावे. अशी मागणी केली असुन दफनभूमी कडे जाणारा रस्ता व तेथील जागा त्वरीत जेसीबी यंत्राच्या साहयाने मोकळा ग्रामपंचायत ने करून दयावा. अन्यथा येणाऱ्या काळात भिल समाज विकास मंचच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असे तालुकाध्यक्ष भोजु अहिरे यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष भोजु अहिरे, कार्याध्यक्ष अर्जुन ठाकरे, पोलिस पाटील भरत बागुल, माजी सरपंच राजु बागुल, शाखा उपाध्यक्ष शरद बागुल, प्रकाश बागुल, राजु अहिरे, शत्रुघ्न भिल, मनोज कुवर, रवींद्र बागुल, मोहन ठाकरे, निलेश बागुल, भोजु मोरे, आकाश बागुल, संजु ठाकरे, सागर बागुल, विशाल ठाकरे, संजय मोरे, नरेश भिल, योगेश बागुल, चंदु बागुल, तुकाराम बागुल आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.