महाराष्ट्र

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या पंटरसह व्यापारी एसीबीच्या जाळ्यात

चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी

दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात खासगी पंटरसह एका व्यापाऱ्याला १० हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील असून ते हाताने दिव्यांग आहेत. त्यांना हाताचे ४० टक्क्यांवर दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी खाजगी पंटर अनिल तुकाराम पाटील (46, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) तर व्यापारी विजय रूपचंद लढे (67, रा.नगरदेवळा, मारवाडी गल्ली, ता.पाचोरा) यांनी केली. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागात तक्रार दिली. यासंदर्भात आज लाचलुचपत विभागाने चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात सापळा रचून पंटर अनिल पाटील आणि व्यापारी विजय लढे यांना दहा हजाराची लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे चोपडा शहरात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.यांनी केली कारवाई

अपर पोलीस अधिक्षक शशिकांत एस. पाटील, पो.नि. संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे