चोपडा
ईनरव्हिल क्लबतर्फे आदिवासींना कपडे वाटप
चोपडा (प्रतिनिधी) येथील ईनरव्हिल क्लब तर्फे सातपुडा कुशीत वसलेले बोर अजंटी गावातील गरिब आदिवासी कुटुंबियांना थंडीत बचाव करण्यासाठी उबदार कपडे तसेच नियमित वापरले जाणारे कपडे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

जवळपास शंभरावर आदिवासी परिवारांना ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष पुनमबेन गुजराथी, सचिव मीना पोतदार, तसेच सर्व सदस्यांच्या हस्ते सदर चा कार्यक्रम संपन्न झाला. स्वेटर, बेडशीट, पँट शर्टस्, साड्या, शाँलस् व ड्रेस यांच्या वाटपाने गरिब आदिवासींचे चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले. क्लब सदस्यांनी आपल्या कडील वापरण्यायोग्य कपड्यांचे या उपक्रमात वाटपाने आपल्या उदारतेचा वेगळा परिचय करून दिला. याप्रसंगी ज्योती वारके, सोनल शहा, किरण पालीवाल, प्रभावती पाटील, किर्ती पाटील, प्रिया जैन, आदी उपस्थित होते.