पिंपळे रस्त्यावरील कॉलनी भागात विविध रस्त्यांचे झाले भूमिपूजन
प्रभाग आठ मधील रस्त्यांचा अनुशेष पूर्णच करण्याचे ध्येय-आ.अनिल पाटील
अमळनेर : युवराज पाटील , तालुका प्रतिनिधी
अमळनेर : शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील पिंपळे रोड व ढेकू रोड परिसर माझ्या हक्काचा असून याठिकाणी लवकरात लवकर रस्त्यांचा अनुशेष पूर्ण करण्याचे माझे ध्येय आहे, आणि त्यादृष्टीने वाटचाल देखील सुरू झाली असल्याची भावना आमदार अनिल पाटील यांनी विविध कॉलनी भागातील रस्ते व विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली.
अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ मध्ये विविध रस्त्यांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला,यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांची होती,यावेळी या प्रभागातील समर्थ नगर येथे योगेश हॉटेल ते काटे सर यांच्या घरापर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकण करणे, भटू चौधरी ते माळी सर यांच्या घरापर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकण, राधाकृष्ण नगर येथे संजय पाटील ते क.मा. साळुंखे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकण करणे,एल. आय. सी. कॉलनी परिसरात रस्ता काँक्रीटीकरण करणे, वर्धमान नगर भागात रस्ता काँक्रीटीकण करणे, सुंदर नगर. भागात रस्ता काँक्रीटीकरण करणे,सुंदर नगर भागातील गट क्र.1525 मध्ये खेळाचे मैदान विकसित करणे ,एस. टी. कॉलनी परिसरात प्रभाकर बडगुजर ते उदय पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण करणे अश्या अनेक विविध ठिकाणी महत्वपूर्ण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान प्रामुख्याने प्रभाग क्र 8 मध्ये विशेष करुन रस्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर अनुषेश बाकी होता,त्यामुळे येथील नागरिकांचे खूपच हाल होत होते तो अनुशेष अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील व नगराध्यक्ष ताईसो सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या क्रियाशिलतेमुळे विकासकामांचा अनुषेश भरुन काढण्याचा प्रयत्न झाला, गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळे रस्ता परिसरातील नागरीक अंर्तगत रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त होते,या आठ कामांच्या भुमिपूजनमुळे परिसरातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान कामाचा श्री गणेशा झाला असला तरी समस्या अजून पुर्णतः सुटलेल्या नसल्याची जाणीव मला असून भविष्यात आपल्या सर्वांची अशीच साथ मिळाल्यास आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही आमदार अनिल पाटील व माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दिली.
दरम्यान प्रभाग क्र 8 मध्ये विविध विकास कामांसाठी निधी दिल्या बद्दल आदर्श नगर, राधाकृष्ण नगर ,स्वामी विवेकानंद नगर, समर्थ नगर, एलआईसी कॅालनी, वर्धनान वगर, सुंदर नगर, एस. टी. कॅालनी व प्रभाग क्र ८ च्या नागरीकांनी आमदार अनिल भाईदास पाटील, नगराध्यक्ष जिजामाता कृषिभूषण सौ पुष्पलता साहेबराव पाटील, मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील व जि.प.सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांचे जाहीर आभार मानले.सदर भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, जयंतराव पाटील, गणेश बोरसे, शुभम बोरसे, सचिन पाटील, यांच्या सह परिसरातील नागरिक, बाळासाहेब पाटील, अरुण देशमुख, विजय पाटील, शिंदे बापू, आनंदा पाटील सर, कुंदन साळुंखे, बोधरे सर, सी. के. जाधव. पी. वाय. पाटील, आर. एस. पाटील साहेब, पंकज पाटील, ईश्वर पाटील, जयराम गुरुजी, विंचूरकर सर, किशोर पाटील सर, मंडळकर काका, शेटे काका, आर. ए. पाटील, उदय पाटील, अनिल पाटील, प्रभाकर बडगुजर, वसंत मंडेवल, पप्पू कदम, सुहास पाटील या भागाचे नगरसेविका अँड. चेतना पाटील, नगरसेवक विवेक पाटील,नगरसेविका गायत्री पाटील अँड. यज्ञेश्वर पाटील उपस्थित होते