भडगाव तालुका समन्वयक समितीवर युवराज पाटील
भडगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुका समन्वयक व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी पाचोरा बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील यांची निवड झाली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या कडून हे पत्र प्राप्त झाले आहे. तालुक्यात सर्वात महत्त्वाची समजली जाणारी समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे युवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंचायत समितीच्या सभापती डॉ. अर्चना पाटील या पदसिद्ध सहअध्यक्ष आहेत. या शिवाय शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख डॉ. विलास पाटील. साई ऑटो चे संचालक डॉ.रावसाहेब शेतकी संघाचे माझी उपाध्यक्ष नागेश वाघ, पथराड चे सरपंच भाऊसाहेब पाटील, कॉँग्रेसचे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, रेखा पाटील (भडगाव), पूनम पाटील (कनाशी), यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी अभिनंदन केले.