नाताळ म्हणजे आनंदाचा आणि हर्षाचा सण : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या नाताळ सणाच्या शुभेच्छा
सिल्लोड (विवेक महाजन) शहरातील वाल्मीम नगर भागात सद्गुरु येशू चॅरिटेबल ट्रस्ट येथे नाताळ सण साजरा करण्यात आला. नाताळ सणानिमित्त येथे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. नाताळ सणानिमित्त या कार्यक्रमात विधवा भगिनींना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.
नाताळ म्हणजे आंनदाचा आणि हर्षाचा सण आहे असे स्पष्ट करीत प्रत्येक धर्म मानवता आणि शांततेचा संदेश देतो. भगवान येशू ख्रिस्तांनी दिलेल्या संदेशाचे पालन व्हावे यासाठी पवित्र बायबलचे वाचन केले पाहिजे असे मत व्यक्त करीत महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेसी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक शेख जावेद, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, मतीन देशमुख, युवा सेनेचे अक्षय मगर, राम कटारिया, फहिम पठाण, राजू देशमुख, पत्रकार प्रकाश वराडे यांच्यासह सद्गुरू येशू सत्संग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी भालेराव, डॉ. प्रकाश कांबळे, प्रभुदास कांबळे, रितेश कांबळे, राज वाघमारे, प्रवीण भालेराव, अनील शेजुळ, संतोष लहाने, मनिषा भालेराव, रेखा लहाने, मनिषा वाघुले, संगीता कांबळे, प्रीती शेजुळ, अर्चना कुदळ आदींची उपस्थिती होती.