राष्ट्रवादी महिला काँग्रेसची नाताळनिमित्त विविध चर्चला भेट
नाशिक (प्रतिनिधी) नाताळ सणानिमित्त नाशिक शहरात ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूचे स्वागत करण्यासाठी घरांसह विविध चर्च भोवती विद्युत रोषणाई केली असून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी पदाधिकारींनी सह आज नाशिक सणाचे औचित्य साधत ख्रिस्ती बांधवांना चर्चमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या.
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोना रोगाने थैमान घातले होते. यंदाच्या वर्षी कोरोना रोगावरील नियम शासनाने शिथिल केल्याने नाताळ सण नाशिक शहरात आनंदात साजरा होत असतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसने नाशिक शहरात विविध चर्चला भेट देत ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्यात.
ईमॅनुएल प्रेयर फेलोशिप चर्च फादर प्रविण शिंदे, ग्रुप ऑफ होप पेन्टीकाॅस्ट चर्च पास्टर रेश्मा कांबळे, इम्मानुएल चर्च असेंब्ली ऑफ गाॅड फादर स्वप्निल गवळी, रेह्मा फेलोशिप चर्च नासिक फादर फ्रॅन्कलिन अनुप यांच्या समवेत प्रार्थना केली तसेच बालगोपाळांना शुभेच्छा दिल्यात. प्रभू येशूला प्रार्थना करत संपूर्ण विश्वाला कोरोना रोगातून संकटमूक्त कर तसेच मानवी जीवन आनंदाचे, सुखसमृध्दी व भरभराटीचे जाऊ दे अशी विनंती केली. यावेळी पास्टर रेश्मा कांबळे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांचे स्वागत व सत्कार केला.
चर्चला भेट देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पंचवटी विभाग अध्यक्ष सरीता पगारे, नासिक रोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, पंचवटी प्रभाग अध्यक्ष संगिता घाडगे, शहर संघटक मंदा काकडे उपस्थित होत्या.