संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे ऑनलाईन वेबिनार संपन्न
सोयगाव विवेक महाजन प्रतिनिधी
सोयगाव : अजिंठा शिक्षण संस्था औरंगाबाद संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव वाणिज्य विभाग व निलया फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री’ यांच्या मार्गदर्शनाने ‘Career Opportunities in Commerce ‘ या विषयावर ऑनलाइन वेबिनार संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीनारायण कूरपटवार यांनी केले यावेळी पाहुण्यांचा परिचय प्रा.निलेश गावडे यांनी केला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गौरी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर काय करावे? कोणते करियर देईल 100% खात्रीशीर नोकरी? कधी होईल लाईफ सेट? अशा विषयावर विद्यार्थ्यांना उद्बोधन केले विद्यार्थी जीवनात कावळ्यासारखी निष्ठा,बगळ्या सारखे लक्ष, कुत्र्या सारखी निद्रा, अल्पाहारी व गृहत्याग हे पाच लक्षणे आवश्यक असणे असे त्यांनी सांगितले. आपल्याला काय करायचे आहे ही आपण प्रथम निश्चित केले पाहिजे जॉब, बिझनेस,का फार्मिंग हे ठरविणे विद्यार्थ्यांनी गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सक्सेस होण्याकरिता पंच सूत्राची आवश्यकता आहे 1)नॉलेज, 2)टेक्नॉलॉजी, 3)प्रॅक्टिकल स्किल 4)सॉफ्ट स्किल व 5) लीडरशिप स्किल ज्या पंचसूत्रीचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवावे आदर्श शिक्षण तेच जे यशस्वी व चांगला माणूस घडतो असे विचार व्यक्त केले या बेबीनार करिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार डॉ. रावसाहेब बारोटे, यांची उपस्थिती लाभली तर वाणिज्य विभागाचे व एम .बी. ए चे सर्व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाचे आभार वाणिज्य विभागाचे प्रा.भाऊसाहेब ठाले यांनी केले.