राज्यस्तरीय खान्देश कस्तुरी गौरव पुरस्काराने प्रा जयश्री दाभाडे सन्मानित
हास्य जत्रा फेम श्याम राजपूत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंच पुणे यांनी प्रा जयश्री दाभाडे यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय खान्देश कस्तुरी गौरव पुरस्काराने सन्मानित केले. ५६ वा पुरस्कार हास्य जत्रा फेम मा श्याम राजपूत, जेष्ठ अहिराणी साहित्यिक सुभाष नाना अहिरे, जेष्ठ कवियत्री साहित्यिक डॉ. उषा सावंत, आयोजक विजयाताई मानमोडे इ मान्यवरांच्या हस्ते प्रा दाभाडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध कलाकार संघपाल तायडे, अहिराणी गझलकार सुदाम महाजन, सदाशिव सूर्यवंशी, सुरेश पाटील, सुप्रसिद्ध व्यावसायिक ओमप्रकाश मुंदडा, महेंद्र महाजन, गोकुळ पाटील, प्रशांत निकम इ च्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिराणी कलाकार प्रवीण माळी, शितल सावंत यांनी केले.
सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असतांना अनेक अडचणी आल्या. अनेक आंदोलने, धरणे, निवेदन यांच्या माध्यमातून वंचित गरीब महिला घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. साड्या, स्वेटर, लहान मुलांचे कपडे यांचं देखील वाटप येते. अनेक प्रकारच्या मिठाई वाटप करण्यात येते.
प्रा जयश्री दाभाडे ह्या नेहमीच अनेक वर्षांपासून दिवाळी, वाढदिवस प्रसंगी गरीब गरजू वंचित घटकांमध्ये जाऊन साजरा करतात. अनेक समाजोपयोगी उपक्रम वृक्षारोपण, अन्न धान्य वाटप, कोरोना काळात सॅनिटायझर मास्क वाटप,जेवण, शॉल वाटप, हिवाळ्यात स्वेटर आणि गरम कपड्यांचे वाटप इ उपक्रम राबवित असतात.आपल्या दोन्ही मुलींचे आणि स्वतः चा वाढदिवस त्या ह्याच पध्दतीने विविध अनोखे उपक्रम राबवून साजरा करतात.
२०१७ ते २०१९ सतत पाणी फाउंडेशन च्या उपक्रमात देखील श्रमदान करून वाढदिवस साजरा केला आहे.आपण समाजाचे देणे लागतो हे भान ठेवून समाजासाठी सतत कार्यरत राहतात. लेखणीच्या माध्यमातून राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यत्मिक, वैचारिक, आरोग्यविषयक लिखाण करून जास्तीत जास्त संवेदनशील विषय हाताळत प्रामाणिक पणे पत्रकारिता करत आहेत. प्रा म्हणून महिला महाविद्यालयात कार्य करत असताना अनेक गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मदत तसेच मार्गदर्शन केले आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून अनेक विषय हाताळून संपूर्ण महाराष्ट्रात जन जागृती करत आहेत. स्पर्धा परीक्षा, मुलाखतीचे तंत्र, वेळेचे नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास, सेल्फ डिफेन्स, महिलांवरील अत्याचार इ विषयांवर व्याख्याने देत असतात.
प्रत्येक संकटावर मात करत आजपर्यंत यशस्वी वाटचाल माझे कुटुंबीय, आई, बहीण, माझ्या दोन मजबूत आधारस्तंभ माझ्या मुली, जावई मयुर नातेवाईक आप्तेष्ट, मैत्रिणी, सहकारी पत्रकार बांधव, महाविद्यालयातील सहकारी या सर्वांचा पाठींबा, सहकार्य, प्रेम स्नेह आशीर्वाद यामुळे आजचा ५६ वा पुरस्कार स्विकारला.