महाराष्ट्र

लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा “धुळे युवा महोत्सव” सांस्कृतिक स्पर्धा-२०२१ उत्साहात संपन्न

नेहरू युवा केंद्र, धुळे आणि के.वाय.के.एम फाऊंडेशनतर्फे कोरोना नियमानुसार स्पर्धा आयोजित

धुळे (प्रतिनिधी) भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र, धुळे आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन नंतरचा पहिला “धुळे युवा महोत्सव” सांस्कृतिक स्पर्धा-२०२१ चे आयोजन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने दि. १७ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली तर २७ डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील एस.एस.व्ही.पी.एस.कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ओडिटोरियम हॉल येथे लॉकडाऊन नंतरचा पहिला “धुळे युवा महोत्सव” सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाली.

या स्पर्धेत नृत्य, नाट्य, गायन या कलाप्रकारात जिल्ह्यातील सर्व स्तरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व्यवस्थापन समिती सदस्य मोहन पावरा आणि सिनेट सदस्य विलास चव्हाण तर अध्यक्ष स्थानी शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र, धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी केले. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आणि स्पर्धेला सुरुवात झाली. यात भारतीय संस्कृतीच्या अनेक प्राचीन व आधुनिक कलेच्या भरतनाट्यम, हिपहॉप, लावणी, गीतगायन, मिमिक्री, एकपात्री नाट्य, रॅप, इत्यादी प्रकारात स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

स्पर्धेचे परीक्षण मुकेश तायडे, रत्ना वाघ आणि सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. स्पर्धेतील सादरीकरणानंतर स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात आला आणि त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक युग बागुल, द्वितीय आंचल निकम, तृतीय शेखर शिंदे, उत्तेजनार्थ मयूर मनोरे, नाट्य स्पर्धेत प्रथम हर्षदा शेलार, द्वितीय कल्याणी क्षीरसागर, उत्तेजनार्थ कावेरी राजपूत, तर गायन स्पर्धेत प्रथम ललित पाटील, द्वितीय रेखा पाटील, तृतीय रुपाली बोरसे, उत्तेजनार्थ जयेश सूर्यवंशी यांनी पटकावला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, मार्गदर्शक निलेश तेलंग, स्वयंसेवक अश्वघोष पवार, हेमराज पाटील, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, कल्याणी मोरे, प्रियंका विसपुते, साक्षी जाधव, दिव्या गवळी, हर्षदा जाधव, मानसी शिसोदे, गौतमी कुलकर्णी, भाग्यश्री भावसार, संजना सरख, एस.एस.व्ही.पी.एस कला व वाणिज्य महाविद्यालयचे निलेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे ललित पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे