आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण ; अधिवेशनात उपस्थित राहिल्याने वाढली चिंता
मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड काल राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्याने आता चिंता वाढली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये वर्षाय गायकवाड म्हणतात, मला आज सकाळी कळलं की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करत आहे.