शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावी खळ्याला आग ; दिड लाखांहून अधिक नुकसान, घटनास्थळी पंचनामा
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील विरदेल गावातील शेतकरी सुधाकर कथ्थु बच्छाव यांच्या खडयास काल दीड ते दोन वाजेच्या दरम्यान भिषण आग लागली. त्यात शेतीपयोगी सुमारे एक लाख सत्तावन हजाराचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी हजर राहून विरदेल मंडळाधिकारी एन.एस.माळी यांनी पंचनामा केला.
काल दि.16 एप्रिल 22 रात्री 1.30 ते 1.45 दरम्यान विरदेल ता.शिंदखेडा येथील शेतकरी सुधाकर कथ्थु बच्छाव यांच्या खडयास भिषत आग लागली होती. सरपंच सुवर्णा सतिष बेहेरे व सदस्य यांनी आग विझवण्यासाठी शिंदखेडा व दोडांयचा येथील आग्नशामन दलाची वाहनास पाचारण करण्यात आले. मात्र सदरील खळ्यातील शेतीपयोगी साहित्य आगीत भस्म झाले होते. सकाळी विरदेल मंडळाधिकारी एन.एस.माळी हे घटनास्थळी दाखल झाल्या नंतर पंचनामा केला असता तर दादर कडवा एक लाख रुपये, बैलगाडी 20 हजार , शेतीपयोगी अवजारे पाच हजार रुपये, लोखंडी पत्रे सहा हजार रुपये, लाकडी दरवाजा सात हजार रुपये, कडबा कुट्टी (ट्राली) 15 हजार रुपये, लाकडी कडे चार हजार रुपये असे एकूण 157000( एक लाख सत्तावन हजार रुपये ) चे शेतकरी सुधाकर कथ्थु बच्छाव यांचे नुकसान झाले आहे. पंचनामा स्थळी सतिष बेहेरे सरपंच प्रतिनिधी, विनायक पितांबर पाटील, गणेश गंगाराम पाटील, नरेंद्र रतिलाल धनगर, ज्ञानेश्वर जयराम माळी, प्रशांत संभाजी पाटील, रामकृष्ण सुधाकर पाटील,सुदाम डोंगर कुंभार आदी समक्ष हजर होते. सदर शेतकरी सुधाकर कथ्थु बच्छाव यांनी आगीत भस्मसात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी तातडीची मागणी शासनाकडे करण्यात आली. विरदेल गावातील ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा सतिष बेहेरे, उपसरपंच सुनील विठ्ठल कोळी व सदस्य आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले होते.