चोपडा तालुक्यात बारामती अग्रो अंतर्गत ऊस उत्पादकांना मार्गदर्शन
चोपडा (विश्वास वाडे) तालुक्यातील गावोगावी जाऊन ऊस लागवडीविषयी मार्गदर्शन करीत आहोत. आडसाली ऊस कसा लावावा.हेच शेतकऱ्यांना अजून माहिती नाही. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन यावर उपाययोजना सुरू आहे. यासाठी जैन इरिगेशन व तज्ज्ञांची मदत होईल आडसाली उसाशिवाय उत्पन्नात वाढ होणार नाही. अशी माहिती बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी. माहिती दिली चोपडा सहकारी साखर कारखाना बारामती अग्रो युनिट चारवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बारामती अग्रो युनिट चारचे जनरल मॅनेजर मिलिंद देशमुख केन मॅनेजर प्रविण भातकर जैन इरिगेशनचे कृषी तज्ज्ञ बी. डी. जडे. कृषी तज्ज्ञ संजय मुटकुळे. चोसाकाचे प्र.कार्यकारी संचालक अकबर पिंजारी आदी उपस्थित होते. बारामती अग्रो उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले की, कारखाना मुळात शेतकऱ्यांचा आहे. गावोगावी जाऊन ऊस पीक परिसंवाद सुरू आहे.यातुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यात ऊस संदर्भात शास्त्रज्ञ कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना केळी. कापूस बाबतीत माहिती आहे. परंतु ऊसविषयी ज्ञान कमी असल्याने ते ज्ञान असणे गरजेचे आहे . जास्त उत्पन्न देणारे कारखान्यास साखर मिळणाऱ्या ऊसाच्या वेगवेगळ्या प्रकाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. 86032,8005,10001.या जाती तंत्रज्ञान विकसित करुन तसेच टेक्निकल पध्दतीने उत्पन्न कसे वाढेल याबाबत ऊस पीक परिसंवादात सांगितले जात आहे.