महाराष्ट्रराजकीय

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्दशाने शहरातील बायपास रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड शहर हद्दीतील ६ किमी अंतरावरील बायपास रस्त्यातील दुरुस्ती तसेच खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सदरील रस्त्याच्या दुरुस्ती बाबत निर्देश दिले होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने सिल्लोड शहरातील ६ किलोमीटर हद्दीतील बायपास रस्त्याच्या कामासाठी तसेच सुशोभीकरण कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली. या कामाच्या प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र सदरील रस्त्यात जास्त गड्डे पडले होते. शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असते.अनेकांना या गड्यांमुळे अपघाताला सामोरे जावे लागले. या रस्त्याच्या कामाला सुरुवात होई पर्यंत रस्त्याची डागडुजी व सदरील रस्त्यातील गड्डे बुजवून त्यावर डांबरी पॅच मारण्यात यावे असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते.त्याअनुषंगाने आज महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाबद्दल वाहन धारकांनी समाधान व्यक्त करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे