चोपडा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रांतधिकारी व तहसिलदारांना निवेदन !

चोपडा (विश्वास वाडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे चोपडा तालुक्यात प्रांतधिकारी व तहसिलदार तथा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

तालुका अध्यक्ष भिवराजदादा रायसिंगे यांच्या नतृत्वखाली निवेदन देण्यात आले की, कोरोना व्हॅक्सीन लसीकरणाला आमच्या विरोध नाही तालुक्यात रेशन दुकांदाराकडून व्हॅक्सीन लसीकरण करण्यासाठी सक्त्ती केली जात आहे. ज्या लोकांनी २ व्हॅक्सीन लसीकरण करून घेतलेले आहे असे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय धान्य मिळणार नाही असे रेशन दुकानदारांकडून सक्त्ती केली जात आहे. हे चुकीचे आहे लोकांवर उपासमारीची वेळ येवू नये कोरोना लॉकडाऊन मध्ये भरमसाट महागाईने सामान्य व गरीब नागरीक होरपळून गेलेले आहेत. ३ ते ४ महिण्यापासून लॉकडाऊन मोकळे झाल्याने परिस्थिती बरी होत होती. तो पर्यंत ओमॉयक्रॉनची भिती निर्माण झालेली दिसुन येत आहे. जे रेशन दुकानदार व्हॅक्सीनचे २ लसिकरणाचे प्रमाणपत्र मागतील असे रेशन दुकानदारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी नाहीतर जनता रेशन दुकानदारांवर कायदेशीर कर्यवाही केल्या शिवाय राहणार नाही. नाण्याचे दोन बाजू आसतात दोघे बाजुचे विचार झाले पाहीजेत भारतीय संविधानाने प्रत्येक नागरीकाला मुलभुत अधिकार दिलेला आहे. त्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये शासनाने याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहे. बेसिक तालुका अध्यक्ष भिवराजदादा रायसिंगे व जिल्हा संपर्क प्रमुख I.t.cell महेंद्र करणकाळे व महेश पाटील शहरध्यक्ष व शहरयुवा अध्यक्ष अनिल रायसिंग व शहर अध्यक्ष विनोद बडगुजर तालुका युवा अध्यक्ष राधेशाम गवळी तालुका संपर्क प्रमुख पुरुषोत्तम शेट व कार्यकर्ते विजय बाविस्कर गोरख वानखेडे आदी कार्य करते उपस्थीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे