कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृष्णलीला साप्ताहिकाचे प्रकाशन व पत्रकार मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न
सोलापूर : मोहोळ येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. संदिपान (दादा) गायकवाड बहुउद्देशीय संस्था व मोहोळ नागरी पतपुरवठा संस्था तसेच जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या वतीने मोहोळ येथे कै.स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या नावाने कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार व कृष्णलीला साप्ताहिकाचे प्रकाशन व पत्रकार मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत(तात्या) माने यांच्या हस्ते संपन्न झाले .
यावेळी माहिती जनसंपर्क संचालनालयाचे उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विजय चोरमारे, तहसीलदार प्रशांत बेडसे, गट विकास अधिकारी गणेश मोरे, नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश डोके, भूमी अभिलेख अधिकारी सुजाता माळी, स्वातंत्र्यसेनानी संदिपानदादा गायकवाड, बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा अशोक गायकवाड, डॉ. कौशिक(तात्या) गायकवाड, नगराध्यक्षा शाहीन शेख, नगरसेविका सिमाताई पाटील, सुरेश गायकवाड, प्रमोद डोके, मुस्ताक शेख इत्यादी उपस्थित होते.