शिंदखेडा येथे विद्यार्थी विरोधी विधेयक मंजूर केल्या विरोधात आज नवीन विद्यापीठ कायद्याची होळी
तहसीलदार कार्यालयासमोर भाजयुमोचे जाहीर निषेध आंदोलन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भाजयुमोचे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर सद्या महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये काही सुधारणा करून सुधारित विधेयक विधान सभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार उच्च शिक्षण मंत्री यांना राज्यातील विद्यापीठांच्या प्र- कुलपती पदी नियुक्त करावी ही शिफारस म्हणजे शिक्षणाला राजकीय अड्डा बनवण्याचा आघाडी सरकारचा घाट आहे. शासनाने कुलपती तथा राज्यपाल व विद्यापीठाच्या स्वायत्त त्यात हस्तक्षेप करणारा निर्णय पारित केला आहे.
महाराष्ट्राच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेला काळीमा फासत कुलगुरू निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करीत सेक्शन ११ सबसेक्शन ३ मध्ये बदल करत राज्यपालांन ऐवजी राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्री यांच्या शिफारशीनुसार विद्यापीठांचा कुलगुरू निवड प्रकियेत बदल करण्यारे विधायक मांडले आहे. प्र-कुलगुरू ची नियुक्ती शासनामार्फत करण्यात यावी अशी शिफारस देखील नवीन विधेयकात सुचवली आहे. तरी हे सर्व बदल विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारे व कुलपती व कुलगुरू यांच्या अधिकारावर गदा आणणारे असून सदर निर्णया विरुद्ध तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी भाजयूमो विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले, परेश शिंपी, अक्षय वाणी, महेश गुरव, अजय भिल, तुषार पाटील, जयेश देसले, गणेश पवार, नितीन गुरव, उदय देसले उपस्थित होते.