रणजीत राजे भोसले यांची धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांची धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रणजित राजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी असून गेल्या अठरा वर्षांपासून पक्षात सक्रिय काम करीत आहे. सन २००३ पासून पक्षात प्रवक्ता ते सरचिटणीस, उपाध्यक्ष, संघटक, युवक जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष आदी पदांवर त्यांनी चांगले काम केलेले आहे. पडत्या काळात सत्ता नसतानाही त्यांनी जनमानसात पक्षाची प्रतिमा उंचावली असल्याने तसेच शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे पक्षाचे संघटन उत्तमरित्या ते करीत असल्याने पक्षाच्यावतीने त्यांना ही चांगली संधी देण्यात आली.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर याअगोदर पाच लोकांची प्रशासकीय मंडळांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये रितेश सुरेश सैदाणे, झुलाल उत्तमराव पाटील, दिनेश दत्तात्रय माळी, किरण गुलाबराव पाटील, सुदर्शन गोपीचंद पाटील हे प्रशासक म्हणून काम करीत असून सदर प्रशासक मंडळांमध्ये रणजीत राजे भोसले यांच्या रूपाने नवीन तरुण अभ्यासू व्यक्तिमत्वला प्रशासनाचा चांगला अनुभव असल्याने त्याठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे, पक्षाचे निरीक्षक अर्जुनराव टिळे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे, ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, संदीप बेडसे आदींनी अभिनंदन केले आहे.



