शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारतमाता पूजन
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील, नवा भोईवाडा परिसरातील बालवीर चौकात बुधवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन करण्यात आले. याप्रसंगी नेताजी सुभाष बाबू मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष ईश्वर मोहन चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले तर भारतमाता आणि हुतात्मा शिरीषकुमार प्रतिमेचे पूजन युवा नेतृत्व राज ईश्वर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे, बालवीर चौकात स्वातंत्र्य संग्रामातील थोर सेनानी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या तसेच देशभक्तीपर गीतांनी परिसर दणाणून गेला होता. भारत माता की जय… वंदे मातरम.. नंदनगरी के शहीद अमर रहे… अशा घोषणांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण झाली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त बालवीर चौकात कुमारी लीना हिरणवाळे या विद्यार्थिनीने रांगोळी रेखाटन केले. माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, आनंदा गवळी, प्रा. एकनाथ हिरणवाळे, राजेंद्र सोनवणे, गोपाळ हिरणवाळे, आमेश कासार, वंदना जवेरी, सुनिता हिरणवाळे, पूजा हिरणवाळे, कु.लिना हिरणवाळे, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.