राजकीय
रामदास आठवले यांची तुषार म्हसदे यांच्या गावी भेट
डोंबिवली (प्रतिनिधी) येथील तुषार म्हसदे यांच्या विवाह प्रसंगी उपस्थित राहता न आल्याने दि.१९ रोजी सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी किन्हवली येथे भेट देऊन तुषार व रुचिता या नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी आठवले यांच्या स्वागतासाठी कांचन उबाळे, वसंत उबाळे, गुरुनाथ सोनावणे, सचिन जाधव, मंगेश थोरात, रवींद्र उबाळे, सुनील उबाळे, डॉ. सचिन उबाळे, राहुल म्हसदे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळाराम जाधव, उपाध्यक्ष विनोद थोरात, शहापूर तालुका उपाध्यक्ष विजय वाढविंदे, जेष्ठ नेते, शाम शेवाळे, नाना उबाळे, किन्हवली विभाग अध्यक्ष किशोर चन्ने आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



