“हर घर नलसे जल” योजनेसाठी ग्रामसभेचे आयोजन – खा.डॉ.हिना गावित
नंदुरबार (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या “हर घर नलसे जल” या महत्वकांक्षी योजनांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे ग्रामीण पाणीपुरवठा कामांना नियोजीत आराखड्यानुसार मंजुरी देण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील गावात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. खा.डॉ. हिनाताई विजयकुमार गावित, आ. डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गावित म्हणाले की, प्रत्येक गावात प्लॉट नवीन वसाहत तयार होत आहे. कोणत्याही व्यक्तीचे घर सुटू नये तसेच अशी योजना एकदा तयार झाल्यानंतर परत तयार करता येणार नाही त्यासाठी आजच व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील तीस वर्षेचे नियोजन करत आहे. केंद्र सरकारच्या “हर घर नलसे जल” या महत्वकांक्षी योजनांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे ग्रामीण पाणीपुरवठा ह्या योजनेला एकाजवेळी केंद्र शासनाकडून मंजूरी मिळत असते. त्यामुळे कोणीही सुटा कामाने. त्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करीत आहोत. वाघोदा गावात दि. ०२/०१/२०२२ सकाळी ९ वाजता , पातोंडा येथे दि. ०२/०१/२०२२ सकाळी १०.३० वाजता , होळ तर्फे हवेली येथे दि. ०२/०१/२०२२ दुपारी १२ वाजता , दुधाळे येथे दि. ०२/०१/२०२२ दुपारी २ वाजता, रनाळे येथे दि. ०२/०१/२०२२ दुपारी ३.३० वाजता , शनिमांडळ येथे दि. ०२/०१/२०२२ संध्या. ५ वाजता कोपर्ली येथे दि. ०३/०१/२०२२ सकाळी ०९ वाजता आयोजन करण्यात आले आहे. विशेष ग्रामसभेसाठी गावातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहुन नियोजीत आराखड्यात काही घरे सुटली असतील, पाण्याच्य उद्भव संदर्भात काही म्हणणे असेल किंवा आपणास या संदर्भात काही सुचना करावयाच्या असतील तर त्या सभेत मांडाव्यात. आराखड्याला ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर कोणाचेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही.